Wednesday, December 30, 2009

'कहाणी उकिरड्याची'

रात्र ती चांदण्यांची
डागाळलेल्या चंद्रमाची
उकिरड्या शेजारची
कहाणी घडण्याची

हळुवार चाहूल झाली
हात अलगद आले
उकिरड्यावरी जन्म
कुणाचे बरे झाले?

पाठ क्षणात फिरली
डोळेही पाणावले
रात्रीच्या स्वप्नात मात्र
बाळ मातेस भुलले

भुंकण्याचा आवाज
बाळ जागे झाले
आई ना शेजारी
कासावीस झाले!

कुणाचे हात ते
तोंडाकडे सरकले
मद्याच्या घोटाने
बाळ दूधास मुकले!

स्वाद असे निराळा
बाळ हुंदका देत
उकीरड्याच्या पाळण्यात
नात्याला झोका देत

आई ना येणार
लाचार ती झाली
उकीरड्याच्या नात्याचा
धडा शिकवून गेली!

बाळाला कळले होते
हेचि माझे घर
त्याचाच बिछाना
नि त्याचीच चादर!

शांत मग पहुडला
धर्म नवा घेऊन
आता ही कहाणी
पुन्हा कोण जाणणार?

रात्र होती चांदण्याची
डागाळलेल्या चंद्र्माची
उकिरड्यात जन्मणाऱ्या
लाचार बाळाची!
त्या लाचार बाळाची.....................

(स्वरचित) :- कु. प्रिती अशोक खेडेकर
२३.१२.२००३ मंगळवार
वेळ : सांयकाळी : ७.१०

Monday, December 28, 2009

'अशीच ती रात'

दिवस सरला, रात सरली नाही
तुझ्यात उरले, माझ्यात उरले नाही

ती होती अशीच चांदण्यांची रात
चांदण्यात चंद्रास तू धरले नाही

घालीत होता वारा थैमान वेडाचा
तुझे वारे वेडात शिरले नाही

अनेकदा शिकविले मी स्वप्नांना
माझ्यात स्वप्न तुझे सरले नाही

झुरली चांदण्यात अशीच रात
तुझे बहाणे का झुरले नाही?

(स्वरचित) :- प्रिती खेडेकर
२७.१२.२००९ रविवार
वेळ : - रात्री १.२०

'रात शिशिराची'

एकटे होते रातीला
सोबती झाला वारा
स्पर्शात झेलून गारवा
छळतो मज शहारा

असेल ती अशीच रात
तुझी ग्रीष्माची मीठी
हरवून गुलाबी स्वप्नी
झेलीन अर्थ ओठी

अल्लड होऊनी भाव माझे
झेलीती शुक्राचे चांदणे
भाळून तुझ्या चंद्रावर
चांदण्या रातीचे जागणे

मनी हि हुरहूर कसली
भेटीलास कि घडेल काय?
घेशील ग्रीष्मात साजणा?
शिशिरही होईल निरुपाय!

बघ आलास तूही
ग्रीष्म होऊन गारव्याचे
शिशिराच्या आठवांत जपते
गीत अपुल्या मारव्याचे

नकोस जाऊस दूर अता
घे मीठीची गोधडी
तुझ्यातूनच सरेल मग
शिशिराची रात थोडी........................
रात शिशिराची थोडी....................

(स्वरचित) : प्रिती खेडेकर
२८.१२.२००९ सोमवार
वेळ : - रात्री १.४५

Sunday, December 27, 2009

'चेहरा आणि मुखवटा'

तू भेटलास असा
नवा चेहरा घेऊन
प्रीतीच्या जाणीवांना
भावात आणून

जाणलेस तू माझे
तुझी होऊन उरताना
अस्पष्ट चित्राचे
चेहऱ्यात रंग भरताना

तू दिलीस स्वप्ने
नसताही माझी झाली
अनोळखी चेहऱ्याची
स्वप्नांसाठी ओळख आली

अकस्मात आले वादळ
दुरावत चालल्या वाटा
ओळखीच्या चेहऱ्याचा का
माग घेई मुखवटा?

कसे साहू आरोप हे
बदनाम तुझा चेहरा?
कदाचित स्वार्थात मला
मुखवट्यानेच केला मोहरा!

इतकेच नको समजूस
चेहरे जे खरयाचे
नको चित्र रेखाटूस
नसलेल्या चेहऱ्याचे

जगते या आशेत
ओळखशील 'चेहरा' माझा
सत्याच्या आरश्यात
पाहशील चेहरा तू, तुझा

भेटेन पुन्हा चेहऱ्यात मी
होईन तुझाच आरसा
न ठेवणार अता
मुखवट्यावर भरवसा!

(स्वरचित) :- प्रिती खेडेकर
२६.१२.२००९ शनिवार
वेळ : - रात्री २.००

Friday, December 18, 2009

'थंडी गुलाबी!'

मंद हि गुलाबी लहर
नशा आणिती मन्मनी
उधळूनी शुक्राचे चांदणे
भाव जपते लोचनी

न सहावे गारवा हा
घे अलगद तव मीठीत
श्वासाचे गीत गाऊ
भेटू पुन्हा ओळखीत
घेऊ गारवा ओठांचा
अंग अंग शहारुनी
श्वासाच्या या ओढीत
अंतरंगी बावरुनी................

द्यावे स्पर्श तू तुझे
घ्यावे मी आपले मानून
स्पर्शवेड्या करांचे
बंध नवे अनुभवून
जाणू गारवा करांचा
स्पर्श स्पर्श सावरुनी
घे ओठांत साजणा
श्वास तुझे आवरुनी..................

कसे हरवले गुलाबी जादूत?
न कळेच माझे मला
प्रभातवेळी पहिल्या दवात
जरी भेटते रोज तुला
अशीच रहावी रात साजणा
गारवा अपुला पांघरुनी
गुलाबी थंडीत स्पर्शाच्या
ऊब 'ग्रीष्माची' घेउनी.......................

स्वरचित : प्रिती खेडेकर
१७.१२.२००९ गुरुवार
वेळ : रात्री २.१५

Tuesday, December 15, 2009

'खंत'

आपलीच माणसं जेह्वा
मुखवटे घालून फिरतात
नात्याची गणितं मांडून
'खंत' होऊन उरतात!

तू तशीच का आहेस?
प्रश्नचिन्हात धरतात
निर्माण झालेल्या भ्रमासाठी
मला 'उत्तर' करतात
माझेच 'संयम' मला
निरुत्तरात आणतात
वैचारिक भ्रमापुढे
हार मानतात

मोकळ्या माझ्या नात्याला
'प्रेम प्रकरण' म्हणतात
मैत्रीच्या जाणीवांना
किमंतीत गणतात
माझेच 'शब्द' नकळत
भावनेत अडतात
व्यक्त होत नाही म्हणून
स्वत:शीच भांडतात

खंत नाही याची कि
चुका त्यांच्यातून होतात
मला सावरण्याच्या ओघात
चुका माझ्यातच चुकतात
माझ्याच 'चुका' मला
नात्यात मारतात
'खंत' देऊन जाणीवांना
परके श्वास भरतात!

नसले जरी आपले नाते
खंताची नाती असतात
मनाच्या वास्तवाला
'खंत' होऊन पोसतात....................
केवळ खंत होऊन पोसतात...................

स्वरचित : प्रिती अ. खेडेकर
१५.१२.२००९ मंगळवार
रात्री : १.०५

Tuesday, December 8, 2009

'येशील ना परतुनी?'

साऱ्यांत मी असताना
कुणात मी नसते
जवळी तुझ्या असताना
दूरही मी नसते
ना मज ठाऊक
का हे होते?
तुझ्यासाठी मन हसताना
तुझ्याचसाठी रडते!

सागरलाटेपरी विचार
लहरी असतात
दूर जाता कुणापासून
परतूनही येतात
असावी आपल्या प्रीतीची उधळण
रंग नवा चढण्यासाठी
माझे तुला देताना
तुझे सर्वस्व घेण्यासाठी...............

नव्या प्रीतीची चाहूल
मनी शहारा हा असला
गंधित मूक्या पुष्पांचा
हा ओलावा कसला?
हास्यकळी उमलूनी मुखावरी
अर्थ नवा दिलास तू
अन् असा गेलास दूर की
आठवणीत राहिलास तू..................

स्वरचित : - प्रिती अ. खेडेकर
वेळ : - दुपारी १२.३९

'तो नाही तसा का?'

(हि कविता त्या प्रिय मित्रासाठी ज्याच्या प्रामाणिक मैत्रीत मी माझे जीवन पुन्हा नव्याने जगू लागले...........)

तो आहे असा कि
तो नाही तसा का?
त्याच्या डोळ्यांत दिसतो
मनाचा आरसा का!

प्रेमळ आहे पण प्रेम मानत नाही
मैत्री करतो पण बंधन ठेवत नाही
तो आहे थोडा हळवा
तो नाही तसा का?

आठवणी जपतो पण आठवणीत जगत नाही
नात्याला मानतो पण त्यात अडकत नाही
तो आहे नाते निभावणारा
तो नाही तसा का?

वचनांची जाण ठेवतो पण उगा वचन देत नाही
शब्दांत मांडतो पण भावनेत येत नाही
तो आहे वचनांसाठी जगणारा
तो नाही तसा का?

गोगलगाय आहे थोडा पण मन तसे नाही
कृतीत घेतो सारे पण विचारात घेत नाही
तो आहे कृतीत मन आणणारा
तो नाही तसा का?

साऱ्यांना सार देतो पण आपल्या माणसांना विसरत नाही
मलाही आपलंच मानतो पण माझा म्हणून उरत नाही
तो आहे मैत्रीला श्वास देणारा
तो नाही तसा का?
जरी नसला तसा तो
मित्रच आहे माझा का!

- प्रिती खेडेकर
२०.९.२००९
रात्री : २.५०

जाणू कशी तुला मी?

जाणू कशी तुला मी
सारे व्यर्थ झाले
ओठांच्या अबोली शब्दा
प्रेमाचे शब्द आले

वेड्या भावाचे चित्र डोळ्यांत
हाती येउनी स्पर्श झाले
रुपेरी रंग प्रेमाचे होते
मनी येउनी अर्थ झाले
जाणू कशी तुला मी
प्रेम कुणाचे झाले
हृदयी त्यास जपता
जीविताचे नाते झाले.....

मोहक आठ्वनिच्या पदरी
पडले ते तव प्रेम होते
झुलानारर्या नाजुक फान्दिवरचे
झुलानारे आपुले घरटे होते
जाणू कशी तुला मी
प्रेम ते स्वप्न झाले
नाही म्हणता प्रेमाचे
अश्रु का नयनी आले?
जाणू कशी तुला मी....?

प्रिती खेडेकर

ठरवल होत खूप काही....

ठरवल होत खूप काही....
तुझ्या असण्यात
मी मला जपाव
तुझ्या मोहक रुपात
मी मला पहाव

ठरवल होत खूप काही....
तुझ्या कुशीत मी
हलकेच याव
नि तुझा हात धरून
क्षितिजाकडे पोह्चाव

ठरवल होत खूप काही....
तुला शीत
सावली कराव
अन् उन्हाच्या चट्क्यात
तुलाच शोधाव

ठरवल होत खूप काही....
आयुष्याच्या वलन वेड्या वाटेवरी
तू ओलखीच स्थान व्हाव
नि भटकलेल्या प्रवाशाप्रमाने
मी तुझ्यावरी घरकुल बांधाव

ठरवल होत खूप काही....
पण सारच कुठे जमत
म्हणून ठरवण्याच्या हट्तातही
तुझ अस्तित्व भासत...

म्हणुनच ठरवते बरच काही.....
प्रिती खेडेकर

प्रितीच्या मनातील काही हळव्या चारोळ्या...........

मैत्री आहें ती माझी
प्रेम मानून टालू नकोस
परक्या मनाला हसवण्यासाठी
माझे अश्रु गाळू नकोस.........
- प्रिती खेडेकर
********************************************
म्हणालास तू निभावशील नाती
नको वेळेचे अंतर मला
त्याच अंतरासाठी तुझ्या
नात्यापासून दूर झाला........

- प्रिती खेडेकर
१७.०९.२००९
सायं : ७.०६
********************************************
असे काय चुकले माझे
मैत्रीही परकी झाली तुला
चार दिवसाच्या नात्याची
ओळख आता कलली तुला ?
- प्रिती खेडेकर
१७.०९.२००९
सांय : ७.१४
********************************************
हरवू नकोस असा कि
तुला मी भेटणार नाही
ओळखीच्या रस्त्यावर
ओळख हि पटणार नाही...........
- प्रिती खेडेकर
********************************************
अबोल शब्दातही
प्रीतीचा एक अर्थ आहे
माझ्या मनाच्या स्वप्नासाठी
माझे प्रेम नि:स्वार्थ आहे...............
- प्रिती खेडेकर
********************************************
पुसू नकोस ती नाती
हरवतानाही तिथेच असेन
नसले जरी ओळखीची तुला
अनोळखी म्हणून भेटेन................
- प्रिती खेडेकर
********************************************
तुझ्या स्वप्नासांठी
मी स्वप्नमाळ झाले
स्वप्नांत अर्थ भेटता
नवे शब्द मिळाले..............
- प्रिती खेडेकर
********************************************
स्वप्न मायेचा झरा
स्वप्न म्हणजे प्रीतीचा अर्थ
स्वप्न जगण्याचे जगणे
स्वप्न म्हणजे निद्रेचा स्वार्थ..................
- प्रिती खेडेकर
********************************************
दुराव्यात वसे स्वप्न
नाते वसे दुराव्याचे
स्वप्नातील मिलनाचे
प्रेम ते स्वप्नाचे..................
- प्रिती खेडेकर

तुला वाटले भरलीस तू
ओंजळ माझी फुलांनी
काट्यांच्या जखमांची
टोच तुला कशी सांगू?
- प्रिती खेडेकर
********************************************
त्या वळणावर माझाही
ओळखीचा एक क्षण आहे
माझ्या मनाच्या जखमांचा
तिथेही एक व्रण आहे...................
- प्रिती खेडेकर
********************************************
तुझ्या काट्याचेच टोचणे
माझ्या सुखाचे अंग आहे
त्या फुलांच्या रंगातही
तुझ्या जखमांचा रंग आहे.............
- प्रिती खेडेकर
********************************************
तू दिलेस इंद्रधनूचे रंग
देऊ कशी टोच जखमांची?
उधळूनी रंग क्षणाचे
ओळख देते जगण्याची..................
- प्रिती खेडेकर
********************************************
तुझ्या गहिऱ्या प्रेमात
मला माझी ओळख पटते
नसले जरी जीवनात तुझ्या
मी मला ओळखीत भेटते..................
- प्रिती खेडेकर
********************************************
समजून घेता येतात सारे
जेह्वा कुणी समजून घेत
दिशाभूल होते तेह्वा
कोसळणार मृगजळ असतं..................
- प्रिती खेडेकर
********************************************
नाते असावे जन्माचे
ना ओळखावे आठवणीवरून
उरावे मनाच्या गाभाऱ्यात
प्रीतीच्या साठवणी करून.......................
- प्रिती खेडेकर
********************************************

कोसळणाऱ्या सरींचा
धर्म तू घेऊ नकोस
कधी ओसाड वाटेला
तुझी आस लाऊ नकोस.............
- प्रिती खेडेकर
********************************************
नकोस सोडूस धर्म
तू नाहीस नभापरी
मी भिजलेल्या सरीमंध्ये
तू जपल्या क्षणापरी..................
- प्रिती खेडेकर
********************************************
माझ्या श्वासात आजही
त्या सरींचा गंध आहे
सावरले असले जरी स्वतःला
मन हे बेदुंध आहे.......................
- प्रिती खेडेकर
********************************************
असले बेसूर गाणे
शब्दांत सूर भेटतो
ओसाड त्या वाटेवरही
मायेचा अंकुर फुटतो................
- प्रिती खेडेकर
********************************************
तू जन्म घेता अनेकदा
माझ्या मरणातही तुला भेटेन
तुझ्या प्रत्येक जन्मासाठी
मी माझे जन्म लोटेन.................
- प्रिती खेडेकर
********************************************
क्षणांना घाबरून केह्वा
आठवण दूर जात नाही
नेहमीच्या आरश्यालाही केह्वा
चेहऱ्याची ओळख पटत नाही................
- प्रिती खेडेकर
********************************************
माझे स्वप्नात येणे
ही तुझी ओढ आहे
जावेच लागते पुन्हा परतून
ही एक तडजोड आहे...............
- प्रिती खेडेकर
********************************************

तुझ्या जीवघेण्या क्षणाला
मी माझे जीवन देते
सोबत नाही आलास तरी
सोबत तुझी आठवण नेते ..............
- प्रिती खेडेकर
********************************************
शब्दांना नाही तोड
दे प्रीतीची त्यांना जोड
तुझ्या ओढीतल्या शब्दांसाठी
नसावी कसली तडजोड........................
- प्रिती खेडेकर
********************************************
जीवन आहे जेथे
तडजोड ही वायची
गेलेच नाही परतून मग
आठवण कुणी काढायची????
- प्रिती खेडेकर
********************************************
हव ते मिळावं म्हणून
प्रेम करायचं नसतं
क्षणांना आठवणी करून
नात जपायचं असतं.......................
- प्रिती खेडेकर
********************************************
********************************************
तुला वाटले भरलीस तू
ओंजळ माझी फुलांनी
काट्यांच्या जखमांची
टोच तुला कशी सांगू?
- प्रिती खेडेकर
********************************************
त्या वळणावर माझाही
ओळखीचा एक क्षण आहे
माझ्या मनाच्या जखमांचा
तिथेही एक व्रण आहे...................
- प्रिती खेडेकर
********************************************
तुझ्या काट्याचेच टोचणे
माझ्या सुखाचे अंग आहे
त्या फुलांच्या रंगातही
तुझ्या जखमांचा रंग आहे.............
- प्रिती खेडेकर
********************************************
तू दिलेस इंद्रधनूचे रंग
देऊ कशी टोच जखमांची?
उधळूनी रंग क्षणाचे
ओळख देते जगण्याची...............
- प्रिती खेडेकर
********************************************

मनाचे असे काही जेव्हा
ओळखीच्या मनाचे भासले
नि:शब्द मनाच्या उत्तरात
मला माझे प्रश्न दिसले ...........
- प्रिती खेडेकर
****************************************
जखमा भराव्या त्याच्या असे
रोजच का घडावे?
कुणी माझ्या जखमावर फुंकर घालावी
असही कधी व्हावे ...........
- प्रिती खेडेकर
****************************************
खुळ्या त्या भावनांचे
शब्दही कधी परके वाटतात
आपलेच काही हरवते फांदीवर
मोडक्या नात्याला झोके देतात ..........
- प्रिती खेडेकर
****************************************

नाती मनाची सावरायला
न काही उरले आता
जेथून चालुनी थकली वाट
ते गावही भुलले आता .................
- प्रिती खेडेकर
*****************************************
माझ्या मनातले जाणावे
असे काहीच नव्हते काही
त्यानेही डोळ्यांत मांडताना
मुकेपणात लपते काही ...............
- प्रिती खेडेकर
*****************************************
तुझ्या डोळ्यांत उतरताना
मी जेह्वा स्वप्न झाले ...........
स्वप्नात हरवलेल्या मनाला
तुझे डोळे मिळाले ........................

- प्रिती खेडेकर
*****************************************
जखमांना हवी मायेची फुंकर
लागते साथ त्यांना नात्याची
अस्तित्वाच्या ओझ्याखाली केह्वा
नातीही देतात ओळख जखमांची ..............

- प्रिती खेडेकर
*****************************************
धरेल हात शब्दांचा
त्यालाच ते नाते कळते
जेथवरून चालून थकते वाट
तिथेच पाउलखूण मिळते ..................

- प्रिती खेडेकर
*****************************************

आपुलकीच्या नात्यातही
विश्वास केह्वा दगा देतो
जखमांना सावरायच्या नादात
खोलवर इजा देतो....................
- प्रिती खेडेकर

मैत्रीत असला विश्वास
विश्व निर्माण होतो
सांभाळता जाणीवांना
भ्रमही साथ देतो..................
- प्रिती खेडेकर

मी माझेच असताना
निभावली मनाची मैत्री
मला 'मी' ने मैत्रीत मारले
इतरांची कसली खात्री?
- प्रिती खेडेकर

सावरू नाही शकलास तेह्वा
बंदिवान झालास
मनाच्या बंधात अडकून
माझा न उरलास!
- प्रिती खेडेकर
*****************************

कसा होणार विश्वासघात तो
आपल्यांना कधी ना भुलला
घेऊन विश्वासात नात्याला
घातही विश्वासात बोलला...................
- प्रिती खेडेकर
३.१२.२००९
सायं : ५.१२

तुझे मुके अश्रू
तीही कुठे गाळत असेल
त्यागाच्या अर्थासाठी
का ती जळत नसेल?...............
- प्रिती खेडेकर
३.१२.२००९
सायं : ५. ३३

नात्याला समजून माझ्या
मी मलाच भेटलो नाही
भावनेच्या या गुंत्याचे
कोडे होऊन सुटलो नाही........................
- प्रिती खेडेकर
****************************
जाणावे प्रेम त्याने माझे
नि:शब्द ओठही काही मागतात
ओठांच्या अव्यक्त शब्दांना
श्वासातून साद देतात..................
- प्रिती खेडेकर

डोळे होते त्याच्या वाटेवर
तोही होता तिथेच उभा
त्याच्या अनोळखी वळणावर
ठेऊ कसा भरवसा?
- प्रिती खेडेकर

स्वप्नांत गुंतलेल्या मनाला
तिनेही मोकळे केले
जागलेल्या तिच्या रात्रीला
तिने मग त्यागात आणले..................
- प्रिती खेडेकर

झाली चळवळ हक्कासाठी
तिला जाळणारे सन्मान देतात
कुंकवाच्या हक्काने मग
स्वार्थी भावनेत तोलतात
- प्रिती खेडेकर

भले तिने केले त्याचे
पोटातल्या आधाराचे
घेऊन दान कुंकवाचे
फेडले ऋण बाजाराचे.....................
- प्रिती खेडेकर

तुझी साठवण तशीच जपली
ओठांच्या नात्यांतून
सावरले मी पापण्यांना
फसव्या माझ्या हास्यातून................
- प्रिती खेडेकर

हक्क मिळवला नाही तरी
जगते आहे तिच्यातली हिम्मत
रस्त्याच्या बाजारात आजही
नसे आत्म्याची विक्री किंमत!
- प्रिती खेडेकर

नसे बाळाला सन्मान
आई तरी मिळते
समाजाच्या दुबलेपणात
एकटीच ती लढते....................
- प्रिती खेडेकर
*********************************

कसे सांगू त्या अश्रूंना
साथ देतात त्याला
करून दगा या डोळ्यांशी
चुकवतात मग नजरा...................
- प्रिती खेडेकर

नसावी माझी ओळख
अश्रूंच्या ओलाव्याची
ओळख मिळावी मला
भिजलेल्या काव्याची.....................
- प्रिती खेडेकर

तो आला असा जीवनात
स्वप्नांशी नाते जुळले
ओढीत जाता काव्याच्या
वेडाचे कारण कळले...........
- प्रिती खेडेकर

त्याने विचारले आला का
वेडा तो स्वप्नांत?
वेडे ठरले आज मी
जी भेटते शब्दांत!
- प्रिती खेडेकर

कसे सांगू त्या वेड्याला
जगणे आहे त्याच्यात
नात्याच्या या उत्तराचे
प्रश्न भेटतील काव्यात...................
- प्रिती खेडेकर



मन माझे फुलवून पिसारे
प्रेम त्याला सांगते
मी माझ्या वसंतातही
त्याचे ग्रीष्म जपते..................
- प्रिती खेडेकर

झुलवण्या त्या प्रेमाला
फांदी आहे थांबली
ग्रीष्माच्या फुलांची
वसंतांत ओळख राहिली................
- प्रिती खेडेकर

अबोल शब्दातही
प्रीतीचा एक अर्थ आहे
माझ्या मनाच्या स्वप्नासाठी
माझे प्रेम नि:स्वार्थ आहे...............
- प्रिती खेडेकर

पुसू नकोस ती नाती
हरवतानाही तिथेच असेन
नसले जरी ओळखीची तुला
अनोळखी म्हणून भेटेन................
- प्रिती खेडेकर

तुझ्या स्वप्नासांठी
मी स्वप्नमाळ झाले
स्वप्नांत अर्थ भेटता
नवे शब्द मिळाले..............
- प्रिती खेडेकर


स्वप्न मायेचा झरा
स्वप्न म्हणजे प्रीतीचा अर्थ
स्वप्न जगण्याचे जगणे
स्वप्न म्हणजे निद्रेचा स्वार्थ..................
- प्रिती खेडेकर


दुराव्यात वसे स्वप्न
नाते वसे दुराव्याचे
स्वप्नातील मिलनाचे
प्रेम ते स्वप्नाचे..................
- प्रिती खेडेकर


तुला वाटले भरलीस तू
ओंजळ माझी फुलांनी
काट्यांच्या जखमांची
टोच तुला कशी सांगू?
- प्रिती खेडेकर


तोडता आलेले नातेही
जोड घेऊन जन्म घेते
तुटलेल्या फांदीवरही मग
नवे घरटे बांधते.....................
- प्रिती खेडेकर

झुंज असली जरी ही
खंत मात्र ठेऊ नकोस
माझ्या आठवणींना असे
परकेपण देऊ नकोस....................
- प्रिती खेडेकर

माझ्या तुटक्या फांदीला
आजही वृक्षाचा आधार आहे
इमारत बांधली जरी स्वप्नांची
माझे घरटे निराधार आहे.......................
- प्रिती खेडेकर

मन बसले तरी
आठवणी धावतात
एका मनाने हरवले तरी
दुज्याचा मार्ग बनतात................
- प्रिती खेडेकर

आपल्या घरात माझे
मी मला शोधत होते
तुझे काही मिळाले तेह्वा
मी नव्या नात्यात होते..................
- प्रिती खेडेकर

तू गुंतत गेल्यावर
माझं काय जाणार?
माझे मलाच हरवताना
तुझे काही भेटणार...................
- प्रिती खेडेकर

जेह्वापासून तू तुझे
सोबत नेणे टाळले
माझे प्रत्येक क्षण मग
तुझ्याकडेच वळले..................
- प्रिती खेडेकर

कसे उठणार ते वादळ
वाराच कमी पडला
जायचे होते दूर देशी
ओसाड मधेच अडला..................
- प्रिती खेडेकर

टाळू नकोस जाणे असे
न जाणे भेटेल कुणी
नव्या रस्त्यावर सापडेल
तुझी ओळख जुनी...................
- प्रिती खेडेकर


योग आला प्रेमाचा
परतूनही गेला
जुन्या तुझ्या अर्थाचा
मग हिशेब केला.....................
- प्रिती खेडेकर

नीतीने मांडली गणिते
मला दुपट्टीत धरले
सूत्र सारी धरून हाती
मला वजाबाकीत मारले....................
- प्रिती खेडेकर

मी बोललेच नाही जर
तुला कसं कळणार?
माझ्या अबोल प्रेमाचा
विसर तर नाही पडणार?
प्रिती खेडेकर

माझ्या धूसर आठवणीतही
तुझ्या प्रेमाची छाप आहे
माझ्या प्रेमाच्या जगण्यासाठी
तुझा गुन्हा माफ आहे..................
- प्रिती खेडेकर

प्रत्येक नव्या सूत्रात
एक गणित अर्ध सुटत
प्रत्येक अर्ध्या गणितात
उत्तरही अर्ध मिळत.....................
- प्रिती खेडेकर

माझी साद ऐकून तू
वाट तुझी सोडून दे
मी चालेल त्या वाटेला
तुझे एकनिष्ठ वचन दे...........
- प्रिती खेडेकर

गोळाफेक चा खेळ
शाळेत फार रंगायचा
हातचे गोळे मोजत मग
डॉक्टर हि भिजायचं....................
- प्रिती खेडेकर


तुझ्या जीवनगीताचा
मी अबोल अर्थ आहे
तुझविनही जगते जी
प्रीत ही व्यर्थ आहे....................
- प्रिती खेडेकर

वास्तवातला जगही
तुझ्या स्वप्नात जगायचंय
तुझे जग जाणताना
तुला वास्तवात आणायचय..............
- प्रिती खेडेकर

विश्वासात आहेस
म्हणून तर जगते
तुझ्या व्यर्थ प्रीतीतही
मी रोज मला भेटते..................
- प्रिती खेडेकर

तू केलेले आरोपही
मी मनातूनच मानले
त्या एका क्षणात मी
काही वेगळेच जाणले.....................
- प्रिती खेडेकर


तुझे प्रेम असेल तर
बहाणाही आज बोलेल
तुझ्या त्या प्रीतीची
सारी नाती ओळखेल....................
- प्रिती खेडेकर

तुझ्या त्या चेष्ठेने तिला
बरीच इजा झाली
तुझ्या जीवनातून मग
हळूच ती वजा झाली.....................
- प्रिती खेडेकर

स्वतःलाही सिद्ध करता
वास्तवातले स्वप्न कसे विसरावे
स्वप्नच तर सोबती एकातांत
हे विसरून कसे चालावे?
- प्रिती खेडेकर

त्या क्षणातच तू तिला
न भरणारी जखम दिलीस
तू मात्र दिवसा जागलास
तिची मात्र रात्र नेलीस................
- प्रिती खेडेकर

मनात रडले मन तुझे
मी हसून देखील रडले
ओळखले नाही त्या प्रीतीला
शब्दांत हळहळले....................
- प्रिती खेडेकर

कशी मागू साक्ष त्याची
त्यानेच आरोपी ठरविले
आधाराच्या नावाखाली
मला भ्रमात ठेवले................
- प्रिती खेडेकर

भिजेल माझी सावली
तुझे आभाळ घेऊन
बरसतील अश्रू माझे
एक सावली हरवून...............
- प्रिती खेडेकर

मनाच्या त्या खेळात
सांग आज कुठे मी आहे?
अजूनही खेळात तुला का
प्रीती माझी पारखी आहे?
- प्रिती खेडेकर

ओंजळीत नात जपताना
आभाळालाही भिडायचं
कुणाचे आभाळ घेताना
आपल्या ओंजळीतलं द्यायचं..........................
- प्रिती खेडेकर

कालही जेह्वा मी मानले
आजही तू मानण्यात आहेस
वचन देण्यात तू आजही
माझ्या वचन घेण्यात आहेस..................
- प्रिती खेडेकर

जीवन नाही शून्य माझे
कधी मन शून्यात जात
नव्या नात्याचा शोध घेत
शुन्यालाही किंमत आणत..............
- प्रिती खेडेकर

क्षितीज असे सत्य
नसे तो आभास
शून्यातून निर्मिती
असे प्रेमाचा वास................
- प्रिती खेडेकर

नाती जरी असली शून्यात
जीवनात गणित मांडतात
आपल्याच किमंतीत मग
आपली किंमत ठरवतात..................
- प्रिती खेडेकर

तुझ्या अनमोल जगातही
माझ्या शून्याला स्थान आहे
मी नसताही त्या जगात
माझ्या असण्याचा मान आहे..............
- प्रिती खेडेकर

प्रेमाला नसती डोळे
दिसते तेच प्रेम कसे?
मनाचे क्षितीज हृदयाशी
भिडते जसे...................
- प्रिती खेडेकर

माझ्या जीवनालाही कळले जेह्वा
तुझ्या आठवणीत काही आहे
मी त्याची होताना कळले
मी तुझ्यातही माझी आहे..........
- प्रिती खेडेकर

मनावर नसतं साम्राज्य
मन असतं मनाचा मित्र
त्याच्या आठवणींवर रेखाटते
आज मी माझे चित्र.....................
- प्रिती खेडेकर

कुणी नाही हिरावत कधी
ठरलेल्या मनाचे राज्य
मनालाही वाटत कधी
असावं कुणी पूज्य...............
- प्रिती खेडेकर

माझ्या शून्य जीवनातही
माझ्या असण्याचे आहे काही
त्याच्या नसण्यातही जाणवते
त्याच्यातच माझे उरले काही.....................
- प्रिती खेडेकर

दूर झाले मनाचे मित्र
मनातूनही साद देतात
अव्यक्त शब्दांचेही
मनातूनच वाद होतात...........
- प्रिती खेडेकर

जो तुझा आहे
तो माझा कसा होणार?
जो माझा आहे
तो तुझ्यात कसा उरणार?
- प्रिती खेडेकर

का असा चित्रांमध्ये
बेरंग आणतोस?
मनातल्या मित्रांना
रंगात टाळतोस?
- प्रिती खेडेकर

जो तुझ्यात उरणार
तो माझ्यात उरणार नाही
मात्र माझ्या आठवणीत
त्याला टाळणार नाही..................
- प्रिती खेडेकर

जे त्यांनी ठरवले आता
रंगून जा तू नव्या रंगात
जीवन नसते असे चालायचे
भूतकालीन संभ्रमात.....................
- प्रिती खेडेकर

रंग कधी रंगाचे
नव्हे चित्रही मांडतो
आपण त्यात बसावे
असे रंग आणतो................
- प्रिती खेडेकर

भुताला सांभाळूनच मी
माझ्या वर्तमानाला जपते
पुन्हा माझ्या वर्तमानाला
आठवणींने जन्म मिळते..............
- प्रिती खेडेकर

जमवून पहा ते चित्र
भरेन मी रंग कधी
तुझ्या जीवन रंगात होईन
तुझे रंगणारे चित्र कधी.....................
- प्रिती खेडेकर

कसे विसरून चालेल हे
भूतालाही भविष्य असते
नासवण्यापुर्वी ते कधी
आपलेच वर्तमान असते.............
- प्रिती खेडेकर

आज माझ्या आठवणीत
तुझ्या प्रेमाचा संवाद आहे
शांत मनात आज का
विचारांशी वाद आहे?
- प्रिती खेडेकर

मान्य तुही केलेस ते
भूत ही असेल सोबत
माझ्या भूत-वर्तमानाच्या कल्पनेत
तुही आहेस सहमत!
- प्रिती खेडेकर

आपल्या प्रेमाचे वाद
मी मिटविले स्वप्नात
तुझ्या संवादाचे अर्थ
मांडले मी शब्दांत....................
- प्रिती खेडेकर

छाया नको धडा घे
पुन्हा भुताला जपण्यासाठी
वर्तमानात चांगलेच जपतात
दु:ख मनात झाकण्यासाठी.............
- प्रिती खेडेकर

भूत सांभाळत मी
माझा भविष्यही जपला
वर्तमानात बोध घेण्या
भविष्यात भूत घेतला..............
- प्रिती खेडेकर

शोधू कुठे सख्या
मन ना माझे राहिले
तुझ्या ओढीत येता
नात्यात आणले................
- प्रिती खेडेकर

कळी बहरते - कोमेजते
कोमेजून पुन्हा बहरते
जीवनाला जगण्यासाठी
नव्या जीवनात सावरते....................
- प्रिती खेडेकर

तुझे न राहणे तुझे
मी माझ्यासाठी मानले
मी मझ्या शोधातही
तुझेच नाते शोधले................
- प्रिती खेडेकर

कुस्करली कशी ती कळी
जेह्वा तू होतास सावरायला?
तिच्या बहराच्या जीवनात
काट्यांना दूर करायला.....................
- प्रिती खेडेकर

तुला मी तोडले माझ्यात
याचे अर्थही तू मांडलेस
मी तसे का वागले
याचे कारणही ना जाणलेस?
- प्रिती खेडेकर

तुझ्या काट्याच्या जखमा
मलाही केह्वा टोचतात
तुझ्या कळ्यांना सावरायला
मला काट्यात मोजतात..................
- प्रिती खेडेकर

शून्यातले जीवन हे
प्रश्न म्हणून राहतील
उत्तरासाठी मग
जीवनाशी भांडतील..........
- प्रिती खेडेकर

मी जे मार्ग बंद केले
तिथेच का तू थांबलास
ज्या मार्गावर मी होते
तिथे का नाही आलास?
- प्रिती खेडेकर

जनाचे नाते कधी
मनालाही कळते
तुझ्या माझ्या नात्यात
नवे मन जुळते...............
- प्रिती खेडेकर

मी कसे मोजू काट्यात
माझा जन्मच काट्याचा
तुझ्या कल्याणच्या दुनियेत
भास नेहमीच ये नात्याचा................
- प्रिती खेडेकर

पाठलाग करीत माझा
तू मागेच राहिलास
मी मागे वळून पाहताना
पाठमोरा तू होतास..................
- प्रिती खेडेकर

तुला काट्यात सोडू कशी मी
माझ्या काट्यांना आपले मानलेस
काट्यांच्या नात्यातही जेह्वा
तू मला फुलांत आणलेस..........
- प्रिती खेडेकर

तू तेह्वा हरला होतास
मी तर केह्वाच हरले होते
पाठमोऱ्या तुझ्या नात्यात
माझे हरणे जिंकत होते
- प्रिती खेडेकर

तू मला फुलविलेस तेह्वा
मी मात्र कोमेजत गेले
तुला काटेच देणार होते
समजून मी हरवत गेले................
- प्रिती खेडेकर

हरले नाही मी तुझ्या नात्यात
नियतीने हरवले मला
स्वप्नाच्या एका फांदीवर
निष्पर्ण केले मला..................
- प्रिती खेडेकर

तू फुलत होतास माझ्यात
मीही फुलत गेले
जेह्वा नियतीने घात केला
प्रेमात काटे उरले................
- प्रिती खेडेकर

तुझ्या तुटक्या फांदीवर
कसे बांधू स्वप्नाचे झुले?
माझ्या काट्याच्या जीवनात
कशी फुलवू मी आता फुले?
- प्रिती खेडेकर

जाळले तेह्वा काटे जाळले
फुलांना मात्र दाह झाला
बह्रणाऱ्या ऋतूमध्येही
काट्यांनाच जन्म मिळाला....................
- प्रिती खेडेकर

माझ्या काट्यात येता तू
जखमांचीच ओळख मिळेल
तुझ्या नात्यातली मी अबोली
शब्दांतही कमी पडेल....................
- प्रिती खेडेकर


ऋतू येतील मग बहराचे
मी ही येईन रे तुझ्यासाठी
जन्म घेतला जरी काट्याचा
सावरेन तुला फुलांसाठी ................
- प्रिती खेडेकर


माझ्या वेदना जेह्वा
तुझे हास्य बनून बोलतील
माझ्या हास्याच्या शब्दांत मग
वेदेनेला वगळतील..............
- प्रिती खेडेकर

नाही घेणार जन्म काट्याचा
जेह्वा फुलांत मला घेशील
माझ्या ऋतूच्या बहरात
बहराचे नाते देशील...................
- प्रिती खेडेकर

तुला जखमात यावे असे
कसे होऊन देणार?
होण्याआधीच भरून त्यांना
तुला माझ्यात जपणार...........
- प्रिती खेडेकर

नात्याला नाव देऊन
करू नकोस प्रेमाचा गुन्हा
माझ्या मनाच्या फुलण्याला
काट्यात नकोस आणू पुन्हा..............
- प्रिती खेडेकर

इच्छा ही शेवटची नाही
पुन्हा माग हवे ते
नसता गोंधळ मनात मग
अर्थात का शेवट येते?
- प्रिती खेडेकर


नियती आपण घडवूया
प्रेम प्रेमाचे जाणून
देऊ काट्यानाही मात
फुलांना नात्यात आणून..............
- प्रिती खेडेकर

सामावलास तू तेह्वाच
शब्दांशी मला जोडलेस
माझ्या काट्याच्या नात्यातही
मला फुलांत गणलेस...................
- प्रिती खेडेकर


त्या घरट्यात अपुल्या
असावी मायेची पाखरे
नियतीच्या प्रत्येक चक्रात असती
आपल्या प्रीतीची लेकरे.....................
- प्रिती खेडेकर

माझ्या प्रीतीत तुला
मी माझी रीत देते
तुझ्या प्रीतीत मी
माझे घरटे बांधते .......................
- प्रिती खेडेकर

तू असता मंद झुळूक वाऱ्याची
मी रात्र होईन
तुझ्या क्षणात विसावण्या
स्वप्न देईन.......................
- प्रिती खेडेकर

नीतीने खेळली चाल तेह्वा
मी दुरावले तुला
अंतरातल्या अंतरात मग
मी मोजले तुला..............
- प्रिती खेडेकर

सत्यालाही भ्रम होतो
असे जेह्वा कळले
तुझे सत्य स्वीकारून मी
माझे भ्रम टाळले...................
- प्रिती खेडेकर

गमावता तुला नात्यात
जीवनही उरले नसते
तुझ्या जीवनात अर्थ घेण्या
शब्दही मुरले नसते..................
- प्रिती खेडेकर

त्याच भ्रमाच्या असण्याने
मला सत्य पटले
नसता त्याची ओळख
मी मला नसते भेटले...............
- प्रिती खेडेकर

तू जेह्वा दिलास हात
मी अंतरात होते
तुझ्या पर्यंत पोहचायला
अंतरच उरले नव्हते..................
- प्रिती खेडेकर

तुझ्या निरुत्तरातही
मी माझे उत्तर शोधेन
तुझ्या मैत्रीसाठी कधी
प्रश्न म्हणून उरेन..............
- प्रिती खेडेकर

माझ्या प्रश्नाचे
मीच एक उत्तर आहे
त्याच्या प्रश्नामध्ये मात्र
मी का निरुत्तर आहे?
- प्रिती खेडेकर

त्याच व्रणाच्या दुखण्यात
कधी मलमही मिळते
विश्वासातच नात टिकत
जखमानंतर कळते .....................
- प्रिती खेडेकर

जमवता फुल मी
काटेच हाती आले
माझ्या मनाच्या बागेत
एक ओसाड जन्मले..........
- प्रिती खेडेकर

तुझ्या मृत्यूवर नाही
जन्मावर असेल जगणे
तुझ्या प्रत्येक श्वासातील मैत्री
हेच माझे मागणे..................
- प्रिती खेडेकर

"नाही" मधले अंतर जेह्वा
"हो" मध्ये कापले
माझ्या या अंतराने
माझ्यातले अंतर मिटले.............
- प्रिती खेडेकर

मृत्युच्या नावाने का
मला असे छळतोस?
जीवन नव्याने जगताना
जगण्याआधीच मारतोस
- प्रिती खेडेकर

जीवन-मृत्युच्या या खेळात
आपण आहोत प्यादे
नियतीच्या पटांगणावर
दैवत्वही हरते....................
- प्रिती खेडेकर

माझ्यातल्या "मी" ने
जेह्वा तुझा 'तू" ओळखला
माझ्यातल्या नकारातही
होकाराचा अर्थ आला..............
- प्रिती खेडेकर

तुझ्यातला "मी" असा
प्रेमापासून पळतो
माझ्यातल्या "मी" ला
नकारात छळतो...............
- प्रिती खेडेकर

तुझ्यातला "तू" तसा
नेहमीच शांत आहे
प्रेमातही अबोल आहे
हीच एक खंत आहे................
- प्रिती खेडेकर

तिच्या डोळ्यांच्या भाषेला
तू जेह्वा शब्द दिले
तिच्या शब्दांत गुंतलेले
नकारही नि:शब्द झाले...............
- प्रिती खेडेकर

शब्दच नाही दिलेस तर
नि:शब्द कसे बोलतील
मनाच्या अर्थाला मग
डोळ्यांत कसे मांडतील?
- प्रिती खेडेकर

अबोल्याचे स्पर्श कळावे
प्रेम करणे योग्य आहे?
मनाच्या खेळातही
शब्दांचेच राज्य आहे...............
- प्रिती खेडेकर

जाणायचं मन तुला
मग स्पर्शात ओळखून घे
डोळ्यांच्या या भाषेला
तूच आता शब्द दे..............
- प्रिती खेडेकर

तुझ्या मिठीत आहे
नसतेही केह्वा
दुनियेच्या मर्यादेचे
भान असते जेह्वा...............
- प्रिती खेडेकर

तुझी मिठीच आता
जगण्याचे सार आहे
दुराव्यातल्या जळण्यात
मी आता लाचार आहे.............
- प्रिती खेडेकर

ओढ तुझ्या मिठीची
मलाही फार छळते
श्वासापर्यंत पोहचायला
माझ्यातूनच जळते................
- प्रिती खेडेकर

मिठीत घ्यायचे होते तर
हे श्वासाचं अंतर का?
आधी फुलणाऱ्या नात्याचे
आधीचे नंतर का?
- प्रिती खेडेकर

आधी असते तर खंत असती
नंतर का नाही भेटले
श्वासाच्या अंतराचे
अंतर लवकर मिटले..................
- प्रिती खेडेकर

उधाण आल नात्यालाही
जेह्वा तुझ्याशी जोडले
एका श्वासाच्या दानात
माझे श्वास पुन्हा जगले.........
- प्रिती खेडेकर

माझ्या प्रेमासाठी जेह्वा
तुझे जीवनगीत गाईन
बेसूर त्या क्षणाला
सुरांत आणीन..................
- प्रिती खेडेकर

माझे सूर जेह्वा
तुझ्या सुरांत गवसले
मी माझ्या बेसूर क्षणात
सूर होऊन भेटले...............
- प्रिती खेडेकर

मिठीतल्या अंतरात
मी तुझे श्वास मोजले
माझे श्वास देता तुला
पुन्हा मी जगले.....................
- प्रिती खेडेकर

माझ्या मनाच्या स्पर्शातही
फक्त तुझा ध्यास आहे
माझ्या जीवन तनातही
मनाचीच आस आहे................
- प्रिती खेडेकर

धगीतल्या या स्पर्शाला
दे शीत ओळख
तुझ्या श्वासात दे
प्रीतीची ही पारख................
- प्रिती खेडेकर

डोळ्यातल्या प्रवासात
कधी वाटेत पूर येतो
आठवणींना भिजवून
आपलाच दूर जातो...........
- प्रिती खेडेकर

शब्दांवाचून मन माझे
मला का छळते?
कुणाच्या ओढीखातर
माझ्यातच जळते................
- प्रिती खेडेकर

त्याच्या अव्यक्त भावनेतही
मी बरेच काही बोलले
लपविण्याचे भाव ही
मनातूनच खोलले...............
- प्रिती खेडेकर

सावरू कसे मी क्षणांना
तेही माझे नाहीत
त्याच्या सुखाचे क्षण,
म्हणतो तुझे नाहीत....................
- प्रिती खेडेकर

विरह कसला हा
हि तर एक खंत आहे
सारे जाणूनही मनाचे
कसा तो शांत आहे?
- प्रिती खेडेकर


कुणी ऐकतेय या आशेवर
शब्दही बोलतात
मुक्या भावनांना
शब्दाशी तोलतात.....................
- प्रिती खेडेकर


शांत जसा हृदयाचा सागर
वादळही शांत असते
उठता लहरी सागरात
मन ना शांत बसते...............
- प्रिती खेडेकर
..............


मी बोलते तुझ्या मनातून
शब्द का मुके असतात
मिलनाच्या आशेवर का
विरहाचे कोडे घालतात?
- प्रिती खेडेकर

जब कूछ केह्कर भी कहा सुनते नही
तो सब कूछ केहकर भी हम कूछ केहते नही...................
- प्रिती खेडेकर


माध्यमाच्या चौकटीत
भावनाही केह्वा अडतात
मनाला कळूनही
मनातूनच झुरतात................
- प्रिती खेडेकर


कोण चोरेल त्याला
असा कुणी पठ्ठा आहे
शहाण्यात प्रेमासाठी
उल्लू दा पठ्ठा आहे...................
- प्रिती खेडेकर

सागरात बुडणाऱ्या नावेला
सहारा किनारा देतो
लाटांशी खेळण्याच्या स्वप्नांत
सागरच दगा देतो....................
- प्रिती खेडेकर

तुझ्या डोळ्यांच्या दोन स्वप्नांत
मी माझे डोळे जाणले
तुझ्या स्वप्नांत पाहण्यासाठी
डोळ्यांचे नाते आणले....................
- प्रिती खेडेकर

डोळ्यांची प्रीत ही
साद देते प्रिती
आसवांच्या नात्यातही
हास्याची प्रचीती.....................
- प्रिती खेडेकर


पाणावलेल्या डोळ्यांतही
तुझ्या असण्याची आस आहे
नसले जरी तुझ्या सुखात
आसवांत माझाच भास आहे.............
- प्रिती खेडेकर

तू गेलास निघुनी जेह्वा
डोळे वाटेवरीच थांबले
त्या वाटेच्या डोळ्यांत मी
कोरड्या स्वप्नांत भंगले................
- प्रिती खेडेकर

जेह्वा तू सांगून गेलास
सुखाचे तुझे कारण
डोळ्यांच्या आसवांत मग
झुरतोस का अकारण?
- प्रिती खेडेकर

तू न जाणू शकलास
माझ्या आसवांचे डोळे
तुला सुखात घेण्यासाठी
जोडले दु:खाचे सोहळे.....................
- प्रिती खेडेकर

तू सुखात आहेस जाणून
माझे स्वप्न जन्म घेतात
दुरावण्याच्या हास्यात मात्र
माझेच डोळे दगा देतात...................
- प्रिती खेडेकर

माझ्या स्वप्नांना जेह्वा
डोळ्यांत जाग आली
प्रेमाला डोळे देऊन
मनाची पापणी झाली....................
- प्रिती खेडेकर

अबोल्यातले डोळे जाणावे
असे शब्द न जाणलेस तू
मनाचे अर्थ उमगेल कसे?
मनात डोळे न आणलेस तू?
- प्रिती खेडेकर

मायेच्या नात्याने जेह्वा
आई-बाबा शब्द जाणले
भावाच्या अर्थात मग
मायेलाही आईपण आले.....................
- प्रिती खेडेकर

मिटलेल्या डोळ्यांचे तू
तुझे चित्र न पाहिलेस
भरताना रंग जीवनात
का अंधारात आणलेस?
- प्रिती खेडेकर

तुझ्या भासाने जेह्वा
माझे डोळे जगत गेले
माझ्या चित्रात मी तेह्वा
तुझ्या डोळ्यांचे रंग भरले..............
- प्रिती

तू जपशील डोळे होऊन तर
पापणीच मला जीवन देते
नव्या दृष्टीने या जीवनात
तुझ्या डोळ्यांचे स्वप्न आणते..................
- प्रिती खेडेकर

तुला अर्पण केले तेह्वा
डोळ्यांत काही खंत होती
माझ्या दृष्टिहीन जीवनात
तुझ्या दिसण्याची भ्रांत होती..........................
- प्रिती खेडेकर

कसे उमगेल ते प्रेम डोळ्यांचे
दृष्टिहीन मी आहे
तू वेधशील त्या नजरेत
दिशाहीन मी आहे................
- प्रिती खेडेकर

तुझे डोळे,राहवत नाही
म्हणून मीही पाहते
डोळ्यांच्या फसव्या जादूला
दोषात मांडते...................
- प्रिती खेडेकर


तिचे डोळे ओळखण्याआधी
तुझे डोळेच लपविलेस
तिथेच होते तिचे डोळेही
नजरेत न वेधलेस..................
- प्रिती खेडेकर

तू ओळखलेस माझ्या स्वप्नांना
हेच डोळ्यांचे सार्थक आहे
काय आहे बघणे डोळ्यांचे?
तुजवीण सारे निरर्थक आहे...................
- प्रिती खेडेकर

क्लास मध्ये बसूनही
खिडकीत का डोळे टांगटोस ?
इशारे स्वतःच करतोस मात्र
दोष का मला देतोस?
- प्रिती खेडेकर

खिडकीत डोकावून तू
मैत्रिणीला पाहतोस
मला पाहून डोळ्यांना
का त्रास देतोस????
- प्रिती खेडेकर

तुझ्या डोळ्यांचे जगणे
मलाही नजर देतात
निरर्थक या जीवनासाठी
डोळ्यांचा आधार घेतात...............
- प्रिती खेडेकर

माझ्या अस्तित्वाशी जेह्वा
तुझे डोळे भिडले
तू नसलेल्या वाटेवरीही
आठवणींशी जोडले....................
- प्रिती खेडेकर

नजरेची भाषा का
डोळ्यांनीच ओळखावी?
मनाच्या डोळ्यांचीही
नवी ओळख व्हावी...............
- प्रिती खेडेकर

जेह्वा जीवन माझे तुला
डोळ्यांत घेते
मी शोधण्यासाठी मला
तुझी नजर होते...................
- प्रिती खेडेकर

उघड्या डोळ्यांचे स्वप्न माझे
तू केह्वा जाणलेस?
माझ्या डोळ्यांच्या खालीपणात
स्वप्न केह्वा भरलेस?
- प्रिती खेडेकर

तुझ्या स्वप्नांतच आहे
माझ्या डोळ्यांचे जगणे
देती नजर प्रेमाची जेह्वा
तुझ्या नात्याचे असणे.......................
- प्रिती खेडेकर

जातो म्हणतोस जेव्हा
डोळा का हा रडतो?
तुझ्या येण्याच्या आशेवरच
नव्या स्वप्नात अडतो..............
- प्रिती खेडेकर

कशी चुकवेल ती नजर
डोळाही प्रेमाचा भुकेला
एका नात्याच्या जगण्यासाठी
दुजाचा सांभाळ केला....................
- प्रिती खेडेकर

कशी सांभाळू नात्याला त्या
डोळे नाहीत मनाचे
दृष्टिहीन हे जीवन
अंधारात आहे केह्वाचे..................
- प्रिती खेडेकर


सांगितले त्या डोळ्यांनी अनेकदा
तू वाचलेस नाही
अव्यक्त त्या मनाला कधी
डोळे दिलेस नाही...................
- प्रिती खेडेकर

माझ्या अश्रूंतही आहेस
हीच डोळ्यांची प्रीती
माझ्या अव्यक्त शब्दांत
तूच आहेस सोबती...................
- प्रिती खेडेकर


तू मन आणशील तर
डोळेही बोलतील
अंधारातही दृष्टी होऊन
फक्त तुलाच शोधतील................
- प्रिती खेडेकर


तुझ्या अंधाऱ्या शोधातही
डोळे काही पाहतात
एका कवडसेच्या भेटीत
दृष्टी देऊन जगतात................
- प्रिती खेडेकर

अंधारातल्या आठवणींना
डोळ्यांत जागवलेस
माझ्या पापण्यांच्या नात्याला
पुन्हा डोळे दिलेस..................
- प्रिती खेडेकर

स्वप्नातली ही राणी
अस्तित्वात केह्वा जाणशील?
तुझ्या डोळ्यांच्या कडेवर
का अश्रू म्हणूनच जपशील?
- प्रिती खेडेकर

भारावलेल्या डोळ्यांनी जेह्वा
नजरेत तुला वेधले
अमूर्त या नात्याचे
शब्दांत चित्र बनले...............
- प्रिती खेडेकर

तुझ्या डोळ्यांत हरवले
मी मलाच भुलले
सुखाच्या जाणिवांत
आसवांतही भिजले..............
- प्रिती खेडेकर

डोळ्यांचे कोडे कधी
तू सोडवलेस नाही
कोड्यातल्या डोळ्यांचे भावही
कधी वाचलेस नाही...............
- प्रिती खेडेकर

दिलेस तू हृदय तुझे
मी माझे म्हणून जपले
डोळ्यापासूनचे नाते हे
आत्म्यात जाऊन लपले...............
- प्रिती खेडेकर

कोऱ्या त्या पाटीवर
लिही शुभं करोति
डोळ्यांच्या कोड्याची
कळेल मग महती..............
- प्रिती खेडेकर

माणसाच्या नात्याला असे
अटीमध्ये का मांडतात?
कुणाच्या निष्पाप मनाला
व्यवहारात का आणतात?
- प्रिती खेडेकर

अव्यक्त जरी असले डोळ्यांतून
श्वास तरी बोलतील
तुझ्या रिकाम्या मनाला ते
प्रीतीने भरतील..................
- प्रिती खेडेकर

तुला डोळ्यांत जपते कारण
राग तुझा लहरी होतो
छळतो जरी शब्द्नात मला
डोळ्यांतून माघार घेतो..............
- प्रिती खेडेकर


महानता मिळवून कधी
बालीशपण हरत का?
निष्पाप चे समीकरण
यात कुठे बसत का?
- प्रिती खेडेकर


प्रेम वाटणारे डोळे
जेह्वा घात करतात
एका स्वप्नात तोडून
दुजासाठीही रडतात..............
- प्रिती खेडेकर

बोलले जेह्वा डोळ्यांचे भाव
तू कधी वाचलेस नाही
अश्रुंच्याही मनात कधी
मला जपलेस नाही...............
- प्रिती खेडेकर

तुला ओळखले होते तेह्वा
डोळ्यांतही चांदणे दाटले
घाताच्या आरोपात
अंधारही चांदण्यात भेटले........................
- प्रिती खेडेकर

अश्रूंना देशील आधार
म्हणून तेही लपले नाहीत
डोळ्यांत आपलं मांडताना
मनातही ते चुकले नाहीत............
- प्रिती खेडेकर

तळ्यातल्या तुझ्या डोळ्यांत
माझे चित्र होते
तुझ्यापर्यंत पोहचायचे
केवळ निमित्त होते..............
- प्रिती खेडेकर

तुझ्या डोळ्यांत उरते मी
हेच माझ्या डोळ्यांचे बघणे
निमित्तातही नाम आहे
त्यांच्या असण्याचे हे जगणे.........
- प्रिती खेडेकर

सूर तेह्वाच आले
शब्दांनी डोळे जाणले
छेडूनी तार मनीची
नात्याला अर्थात आणले...........
- प्रिती खेडेकर


चित्र रेखाटले तू जेह्वा
या पानेरी डोळ्यांचे
मी हि मांडले तळे
भावस्पर्शी आठवणींचे...............
- प्रिती खेडेकर


डोळ्यांत तुझ्या मी
शब्द होऊनच थांबले
तू वाचशील या आशेत
ते मुकेच राहिले..............
- प्रिती खेडेकर

स्पर्श हा मलाही छळतो
डोळ्यांचे नाते देतो
होठांच्या कंपनाचे
डोळ्यांत शब्द घेतो..........
- प्रिती खेडेकर

नसे मी चंद्रकोर वा सूर्यबिंब
मी डोळ्यांतील चांदणे
रात्रीच्या चंद्रमाचे
मी स्वप्न देखणे..........
- प्रिती खेडेकर


मुक्तरंगात या बाहुच्या
दिले स्पर्श रेशमी
उधळलेल्या शब्दांचे
भाव उमटे लोचनी................
- प्रिती खेडेकर

मैत्री नसते अटींवर कायम
टिकवायची म्हणून टिकवावी
नात्याच्या नियमांसाठी
स्वार्थ बनवून झुकवावी.....................
- प्रिती खेडेकर

तू माझी मी तिची
अटींवर का थांबावी
तिची साथ नसतानाही
ती मैत्री न व्हावी?
- प्रिती खेडेकर

मैत्री टिकते मनावर
बनून मधुर आठवण
माहेरवाशीण लेकीची
होतेच ना पाठवण...............
- प्रिती खेडेकर

मैत्री माझी असेल
विश्वासाची ओळख
तिच्या प्रेमाच्या विश्वात
माझीच होईल पारख...................
- प्रिती खेडेकर

आज तिच्या दूराव्यातही
माझी मैत्री भेटते
अनोळखी नात्यातही
तिचीच ओळख पटते...........................
- प्रिती खेडेकर

नसली जरी या जन्मी
पुढला जन्म राखला
तिच्या मैत्रीच्या आठवणींत
हा जन्म हि जगला...............
- प्रिती खेडेकर

डोळ्यांत धावणाऱ्या आठवणींचे
"प्रीती" हे विसाव्याचे स्थान
कुणीही जिंकलं कुणीही हरलं
विसरत नाहीत आपलं भान........................
- प्रिती खेडेकर

तुझ्या मैत्रीत माझे
असणे बहरले
तुझ्या नसण्यातही
ते सावरले.............
- प्रिती खेडेकर

तुझ्या मैत्रीत जगले
माझे अनेक श्वास
तू दुरावली तरी असेल
आठवणींचा सुवास...........
- प्रिती खेडेकर

कोरड्या माझ्या डोळ्यांचे
भावही त्याने वाचले नाहीत
खांदा देता आसवांसाठी
अश्रू मात्र पुसले नाहीत..........................
- प्रिती खेडेकर

कसे समजाऊ त्या डोळ्यांना?
आजही तुझीच खंत आहे
शांत या आसवांची
आठवण मात्र अशांत आहे................
- प्रिती खेडेकर

तुझे डोळे हसवण्यासाठी
मी स्वप्नातच भंगले
तुझे अतूट स्वप्न घेऊन
आसवांत मी रंगले..................
-प्रिती खेडेकर

ज्या जगात तू नाहीस
ते जगणे कसे जगवू?
तुझ्याविना सौख्याचे
चित्र तरी कसे रंगवू?
- प्रिती खेडेकर

दृष्टिहीन तुझ्या डोळ्यांना
दोष कसा देऊ?
पाहिले नाहीत अश्रू स्पर्शांनी
विश्वास कसा ठेऊ?
- प्रिती खेडेकर

तुझ्या प्रत्येक नात्यासाठी
मैत्रीचा देईन हाथ
तुजवीण मैत्री अधुरी
जणू आईवीण अनाथ
- प्रिती खेडेकर

तुझ्या मोहक डोळ्यांची जादू
अशी काय झाली
मी माझेच उरले नाही
प्रीतीची नशा आली................
- प्रिती खेडेकर

पाषाणाला देव मानण्यात
नसतो हा डोळ्यांचा गुन्हा
माझ्या मनाच्या देवपणाचा
मांडू नकोस प्रश्न पुन्हा!
- प्रिती खेडेकर

सावरलेल्या पापण्यातुनही
सुक्या नजरा काही सांगतात
माझ्या डोळ्यांच्या जखामांसाठी
मलमाची आस धरतात..................
- प्रिती खेडेकर

तुझ्या चिंब क्षणातही
चातकाचे जिणे देतोस..................
पाउस देऊन मैत्रीला
प्रेमाला कोरडेच ठेवतोस..................
- प्रिती खेडेकर

तुझ्या चिंब क्षणातही
चातकाचे जिणे देतोस..................
पाउस देऊन मैत्रीला
प्रेमाला कोरडेच ठेवतोस..................
- प्रिती खेडेकर

नि:शब्द झालास तू
करू कसे मी व्यक्त?
माझ्या मैत्रीत आहे
तुझे असणे फक्त!
- प्रिती खेडेकर

तुझ्या प्रत्येक शब्दासाठी
अव्यक्त माझे अर्थ
प्रेमाच्या भावनेशिवाय
मैत्रीही आहे व्यर्थ..........................
- प्रिती खेडेकर

तुझ्या डोळ्यांत थांबले
क्षण माझे ना जायचे
तुझ्यासवे मुके होऊन
डोळ्याने सारे सांगायचे................
- प्रिती खेडेकर

डोळ्यांत वाच माझ्या
स्वप्न तू उद्याचे
क्षण जमवून आजचे
भूत दे नात्याचे..............
- प्रिती खेडेकर

डोळे नसती केवळ अंग
असती मनाचे दर्पण
पाहून घे तुझे काही
जे माझे तुला अर्पण................
- प्रिती खेडेकर


मिटलेल्या पापण्यांचे
डोळे तू वाचलेस असे
वाळवंटात मृगजळाचे
फसवे भास जसे.............
- प्रिती खेडेकर


माझे गाणे मनातून
तुझ्या ओठांवर थांबले
मी माझे शब्द घेऊन
ओठांना गाण्यात बांधले.............
- प्रिती खेडेकर

ओठांच्या अबोल नात्याची
तुझ्या श्वासातून साद आहे
अव्यक्त मनाचाही
विचारांत का वाद आहे?
- प्रिती खेडेकर


नाही समजू शकलास तू
अबोल ओठांचे गाणे
ओळखलं नाहीस शब्दांनाही
लाचारीचे हे जगणे..................
- प्रिती खेडेकर

निमित्त तुझ्या ओठाचे
म्हणून मीही काही सांगते
ओठांच्या या मिलनाचे
काव्यात शब्द मांडते..............
- प्रिती खेडेकर

ओठांना सांगता न येणे
यात माझा दोष कसा?
ओळखले नाहीस अव्यक्त मनाचे
ओठांवर ठेऊ विश्वास कसा?
- प्रिती खेडेकर


मला आपला मानताना
ओठांनाच का लाचार केलेस?
ज्याच्या विश्वासात मी जगले
त्या शब्दांनाच माघारी नेलेस!
- प्रिती खेडेकर

ओठांत काही न येता
शब्द डोळ्यांतून बोलले
आसवांचे गीत होऊन
श्वासात रुळले.............
- प्रिती खेडेकर

कसा काढू रोष असा
ओठांची मीही आहे
तुझ्या कोऱ्या मनाची
तीच वही आहे!
- प्रिती खेडेकर


कधी ओठ असती मकरंद
कधी होतात कंटक
शब्दांच्या रूपकाचे
करिती कायापालट..............
- प्रिती खेडेकर

कधी ओठांना मिळतो संवाद
कधी होतो विचारांत वाद
कधी श्वासाच्या अर्थातही
शब्दांचाच अपवाद!
- प्रिती खेडेकर

तुझे काहीबाही चे बोलणे
ओठांनाही त्रास देतात
माझ्या ओठांत उतरताना
शब्दही काहीच घेतात..............
- प्रिती खेडेकर

कोऱ्या माझ्या वहीतही
वसते सरस्वती
ओठांवर मग हासते
निर्मळ भक्ती.....................
- प्रिती खेडेकर

शरीरावरच्या भक्तीची
मनी नसावी मूर्ती
ओठांच्या अबोल्यातही
मनाचीच असावी भक्ती...............
- प्रिती खेडेकर

कसा टळेल अनर्थ
जाणलीस शारीरिक भक्ती
ओठांतल्या मनाची
न कळली महती.............
- प्रिती खेडेकर

ओठांच्या विवंचनेत
शब्द माझेही अडखळतात
तुझ्या ओठांपर्यंत पोहचताना
मनाला घेऊन वळतात...............
- प्रिती खेडेकर

नको करूस सक्ती हि
ओठांना हसवत राखण्याची
कळू दे त्यानाही किंमत
दु:खानाही चाखण्याची...................
- प्रिती खेडेकर

तुझ्या ओठांच्या तिळाने
केले घायाळ मन
तुझ्या चिंब शब्दातही
शोधते माझा घन................
- प्रिती खेडेकर


राधेच्या ओठांवरी
कान्हाची बासरी
तरी का म्हणती सारे
राधा हि बावरी...................
- प्रिती खेडेकर

बावरी नसे राधा
छळते ओठांची बासुरी
कान्हाच्या प्रेमातही का
राधाच असते बावरी?
- प्रिती खेडेकर

ओठांवरच्या जखमांनी
शब्दांशी स्पर्धा केली
त्याच्या ओठांत जाण्यासाठी
माझी ओळखही चोरून नेली............
- प्रिती खेडेकर

माझ्या ओठांनी त्याच्यासाठी
माझ्याशीच दगा केला
सांगून टाकले सारे भेद
जीव हा तुटका झाला.......................
- प्रिती खेडेकर

शब्दांच्या रीतीने
ओठांना शब्द दिला
माझे मला न कळलेला
अर्थही त्याला कळला..................
- प्रिती खेडेकर

राहिले काही द्यायचे
ओठांचे ओठांना
श्वासात भेटायला
सांगायचे नात्यांना...............
- प्रिती खेडेकर

नात्याच्या असण्याचेही
ओठांत एक नाते असते
खोट्या ओठांच्या नात्यात
खरे नाते डोळ्यांत भेटते...............
- प्रिती खेडेकर

थांबले क्षण माझे
तुझे ओठही थरथरले
मिठीत येता सख्या
मी पुन्हा जगले...............
- प्रिती खेडेकर

ओठांच्या एकटेपणात
तू जेह्वा साथ दिलीस
शब्दांना सावरायला
प्रीतीची वाट आणलीस.............
- प्रिती खेडेकर

नकळे कधी उघडले
ओठ माझ्या शब्दांचे
जाणुनी माझ्यातले शब्द
गुज जाणले तव ओठांचे..............
- प्रिती खेडेकर

मी नव्हते तेह्वाही माझे
तुझे ओठ अव्यक्त
मनातूनही साद देती
शब्द तुझे फक्त ..................
- प्रिती खेडेकर

कुणाचे नाम जेह्वा
ओठांवर थांबतात
माझे श्वास शब्द घेऊन
मनात अर्थ मांडतात..............
- प्रिती खेडेकर

ओठांत दंश हा
मनी रुतला काटा
आपल्याच मार्गाच्या
परक्या पायवाटा.................
- प्रिती खेडेकर

ओसाड ते गाव
आजही साद देते
तुझ्या ओठांची
ओळख ठेऊन जाते.............
- प्रिती खेडेकर

सांगितलेस नाही शब्दांना
ओठांत मिटताना
माझे मजपासून
काही हिरावताना..................
- प्रिती खेडेकर

दाद कवी स्वीकारतो
म्हणजे शब्द का अटी मांडतात
आवड व्यक्त व्हावी भावनेत
उगाच शब्दांत अती भांडतात...............
- प्रिती खेडेकर

कधी वाटत आपलच घेऊन
आपणास शोधावे
मुक्या शब्दांना ओठ देऊन
शब्दांतही बोलावे...............
- प्रिती खेडेकर

घेउनी स्पर्श आगळा
ओठही झाले नि:शब्द
तुझ्या श्वासाच्या आक्रोशात
श्वास माझे स्तब्ध!
- प्रिती खेडेकर

लाली चढवून ओठांवर
प्रीत रंगात गाईली
लपविलेल्या त्या जखमांची
ओळख सांगायची राहिली.....................
- प्रिती खेडेकर

ओठांवरी नाम भूमीचे
मनात रुजली भक्ती
नि:स्वार्थालाच स्वार्थ ठरली
अशी कशी हि नियती?
- प्रिती खेडेकर

मुकेपणाचे नाते
ओठातही जगते
मिटलेल्या अर्थातही
बरेच बोलते...............
- प्रिती खेडेकर

नि:शब्द तुझे नाव
ओठातून येणार
याच एका आशेवर
मीही मनातून बोलणार.................
- प्रिती खेडेकर

माझ्या आठवणीना तू
ओठांत आणलेस
शब्दांना मुक्त करून
आठवणींत जाणलेस....................
- प्रिती खेडेकर

नको असे परतावूस त्यांना
जे आहेत तुझ्या ओठाचे
माझ्या चंचल शब्दांना
त्यांनीच तर सांभाळायचे..................
- प्रिती खेडेकर

भाव अनावर झाला कि
ओठांतून ते ओसंडतात
मनाच्या चोरटेपणाला
अर्थात पकडतात................
- प्रिती खेडेकर


आपुलकीच्या नात्यातही
विश्वास केह्वा दगा देतो
जखमांना सावरायच्या नादात
खोलवर इजा देतो....................
- प्रिती खेडेकर

मैत्रीत असला विश्वास
विश्व निर्माण होतो
सांभाळता जाणीवांना
भ्रमही साथ देतो..................
- प्रिती खेडेकर

मी माझेच असताना
निभावली मनाची मैत्री
मला 'मी' ने मैत्रीत मारले
इतरांची कसली खात्री?
- प्रिती खेडेकर

सावरू नाही शकलास तेह्वा
बंदिवान झालास
मनाच्या बंधात अडकून
माझा न उरलास!
- प्रिती खेडेकर

विश्वास तर होता टिकवून
मम अंतरंगाचे शब्द
मैत्रीच्याही आड येते
गैरसमजुतीचे प्रारब्ध!
- प्रिती खेडेकर

तेह्वाही होता विवेक
जेह्वा आपल्यात आले
मैत्रीच्या आपलेपणात
विवेकात परके झाले...................
- प्रिती खेडेकर

सारे काही शोधताना
शोध म्हणून उरावे
कधी कुणाच्या शोधात
नाते होऊन सापडावे..............
- प्रिती खेडेकर

ग्रहणाच्या त्या काळात
चंद्रही झाकाळतो
तुझ्या माझ्या प्रेमाची
लपून आसवे गाळतो..............
- प्रिती खेडेकर

एक सत्य चांदण्यांचे
चंद्राने पारखले
धूसर नक्षीतही
प्रेमास ओळखले.......................
- प्रिती खेडेकर

शब्द माझे चांदणे
भाव चंद्रात मांडला
तुझ्या चांदण्या प्रेमासाठी
माझा चंद्रही थांबला................
- प्रिती खेडेकर

तू दिलीस साद चंद्रात
नभी प्रेम दाटताना
तुझ्या एकांत रातीसाठी
चांदणे माझ्यात भेटताना.........................
- प्रिती खेडेकर
.

नात्यात आले मी
तव प्रेमात बावरले
तू नसलेल्या क्षणातही
माझ्या नात्याला सावरले...................
- प्रिती खेडेकर
३०.११.२००९ सोमवार

कलेतून वाढावे अन
कलेतून घटावे
चंद्राचे प्रेम सये
मर्यादेत ओळखावे..................
- प्रिती खेडेकर

कसा होणार विश्वासघात तो
आपल्यांना कधी ना भुलला
घेऊन विश्वासात नात्याला
घातही विश्वासात बोलला...................
- प्रिती खेडेकर
३.१२.२००९
सायं : ५.१२

तुझे मुके अश्रू
तीही कुठे गाळत असेल
त्यागाच्या अर्थासाठी
का ती जळत नसेल?...............
- प्रिती खेडेकर
३.१२.२००९
सायं : ५. ३३

तुझे मन आभाळ होता
चंद्र प्रेमात भेटतो
माझ्या चांदणीच्या आभाळात
केवळ अंधार दाटतो
- प्रिती खेडेकर
४.१२.२००९
दुपारी : १.०६

मनाच्या थंडीत
काव्य फुलले
मायेचे धुके कसे
आपल्यातच भुलले
- प्रिती खेडेकर
सकाळी : ११.३६
*********************************
रंग बेरंग आहेत संग?
रंग भरतात बेरंगात रंग
पळ कोण कसा काढील
जर रंगणार चित्र बेरंग
- प्रिती खेडेकर
१२.०५
*********************************
तू उत्तर देण्याआधी
दिले मी उत्तर
माझ्या प्रश्नात दे
तुझे जे भाव निरुत्तर
- प्रिती खेडेकर
*********************************
त्याच प्रश्नांत तुला
उत्तर तुझे मागते
मी माझे भाव मांडून
तुला कोडयात आणते!
- प्रिती खेडेकर
*********************************
तुला कंफ्युझ करण्याचे
शब्द नाहीत हे भारी
जिथे म्हणायचे Sorry
तू म्हणतोस आहे आभारी!
- प्रिती खेडेकर
*********************************
मुक्या तव नयनांचे
भावगीत असे प्रीत
डोळ्यातूनही वाचते रात्र
स्वप्नाची शाब्दिक जीत................
- प्रिती खेडेकर
*********************************
तोही वेडा येतो स्वप्नात
माझे स्वप्न जागवण्यासाठी
त्याच्या स्वप्नाच्या रातीला
माझी साथ जगवण्यासाठी................
- प्रिती खेडेकर
*********************************

तुझ्या विरहात सख्या
चंद्रात रात्र दाटते
तिमीरात माझ्या मनीच्या
मी चांदण्यात पेटते.....................
- प्रिती खेडेकर


लपवून सारे मनाचे
रात्रीच्या स्वप्नांत खुलते
तुझ्या विरहात सख्या
मी अंधारात जळते..................
- प्रिती खेडेकर

तू दिलीस रात्र मला
भिजल्या पापण्याची
विरहात जागते आस
नात्यात जागण्याची..................
- प्रिती खेडेकर

नसेल माझ्या रात्रीत
तव ओठांचे मीलन
साद घालील श्वासांना
ओठांचे विरहगान...............
- प्रिती खेडेकर

नाती आणलीस आठवणींत
रात्र माझी जागवून
केलेस आसवांना जागे
विरहांना नाती सोपवून....................
- प्रिती खेडेकर

जाणावे प्रेम त्याने माझे
नि:शब्द ओठही काही मागतात
ओठांच्या अव्यक्त शब्दांना
श्वासातून साद देतात..................
- प्रिती खेडेकर

डोळे होते त्याच्या वाटेवर
तोही होता तिथेच उभा
त्याच्या अनोळखी वळणावर
ठेऊ कसा भरवसा?
- प्रिती खेडेकर

स्वप्नांत गुंतलेल्या मनाला
तिनेही मोकळे केले
जागलेल्या तिच्या रात्रीला
तिने मग त्यागात आणले..................
- प्रिती खेडेकर

झाली चळवळ हक्कासाठी
तिला जाळणारे सन्मान देतात
कुंकवाच्या हक्काने मग
स्वार्थी भावनेत तोलतात
- प्रिती खेडेकर

भले तिने केले त्याचे
पोटातल्या आधाराचे
घेऊन दान कुंकवाचे
फेडले ऋण बाजाराचे.....................
- प्रिती खेडेकर

तुझी साठवण तशीच जपली
ओठांच्या नात्यांतून
सावरले मी पापण्यांना
फसव्या माझ्या हास्यातून................
- प्रिती खेडेकर

हक्क मिळवला नाही तरी
जगते आहे तिच्यातली हिम्मत
रस्त्याच्या बाजारात आजही
नसे आत्म्याची विक्री किंमत!
- प्रिती खेडेकर

नसे बाळाला सन्मान
आई तरी मिळते
समाजाच्या दुबलेपणात
एकटीच ती लढते....................
- प्रिती खेडेकर

तो आला असा जीवनात
स्वप्नांशी नाते जुळले
ओढीत जाता काव्याच्या
वेडाचे कारण कळले...........
- प्रिती खेडेकर

त्याने विचारले आला का
वेडा तो स्वप्नांत?
वेडे ठरले आज मी
जी भेटते शब्दांत!
- प्रिती खेडेकर

कसे सांगू त्या वेड्याला
जगणे आहे त्याच्यात
नात्याच्या या उत्तराचे
प्रश्न भेटतील काव्यात...................
- प्रिती खेडेकर

शब्दांत भेटते मी
नवे शब्द घेऊन
नव्या अर्थाला नवेपणाचा
साज लेवून.................
- प्रिती खेडेकर

तुझ्या एकटेपणात
नसे तू एकटी
शब्दांच्या साथीने
नसे अर्थाची ओहोटी..............
- प्रिती खेडेकर

मन माझे फुलवून पिसारे
प्रेम त्याला सांगते
मी माझ्या वसंतातही
त्याचे ग्रीष्म जपते..................
- प्रिती खेडेकर

झुलवण्या त्या प्रेमाला
फांदी आहे थांबली
ग्रीष्माच्या फुलांची
वसंतांत ओळख राहिली................
- प्रिती खेडेकर


तुझी रात्र स्वप्न भेदून
विरहात मजला छळते
जखमा देऊन डोळ्यांत
आठवणींना अश्रूंत गाळते...................
- प्रिती खेडेकर

कसे सांगू त्या अश्रूंना
साथ देतात त्याला
करून दगा या डोळ्यांशी
चुकवतात मग नजरा...................
- प्रिती खेडेकर

नसावी माझी ओळख
अश्रूंच्या ओलाव्याची
ओळख मिळावी मला
भिजलेल्या काव्याची.....................
- प्रिती खेडेकर

वादळाशी भिडताना
श्वासांनाही सावरलं
तुटलेल्या मनाला
शब्दांत आवरलं
- प्रिती खेडेकर


आलीस तू वचनांत
मी माझे शब्द दिले
तुझ्या नावाच्या सन्मानार्थी
नाते चोरून नेले.....................
- प्रिती खेडेकर



काटे निवडुंगाचे ते
वाळवंटीच टोचायचे
आपल्या नात्याच्या बागेत
केवळ फुलांना वेचायचे.......................
- प्रिती खेडेकर

रात्र असे मिलनाची
रात्र छळते विरहाची
नात्याच्या खेळात
जळते रात्र भ्रमाची.....................
- प्रिती खेडेकर

बरसत रहा तुही
आनंद वर्षेने
नको तोडूस फुलांना
काट्यांच्या इर्षेने..................
- प्रिती खेडेकर



( मी यातील बहुतांश चारोळ्या ऑन लाईन असताना लिहिल्या आहेत! त्या कुठे कॅम्यूनीती मध्ये सेव केल्या होत्या. त्याच इथे टाकल्या आहेत! काही चारोळ्या रिपीट झाल्या असतीलही................क्षमा करावी त्यासाठी...............आणि गोड मानून घ्यावं.....................)

'गाऊ कशी अंगाई?'

फुटक्या या संसारात
लाचार तुझी आई
कसे पाजू दूध? बाळा,
गाऊ कशी अंगाई?

बाप तुझा दरिद्री
दारू रोज ढोसतो
लाथा-बुक्क्यांचा माराने
मला पोसतो

झोपडी नाही बाळा
मग छप्पर कसे दिसेल?
अंगणात निजवता तुला
छप्पर तेथेच असेल........

अंगावरी नाही कापड
झोळी कशी बांधू?
भोकं पडलेल्या पदराने
वारा कसा घालू?

पोटासाठी नाही भाकर
दूधही आटले
तुझ्या जन्मासाठी
ऋण थोडेच फेडले!

सांग बाळ माझ्या
कोण दीनांचा नाथ?
आई-बाप असूनही
का तू अनाथ?

तुझ्या आसवांचे कष्ट
माझे हातही लाचार
म्हणूनच दुधावरही तुझा हक्क
अर्ध्या पोटावर!

मला ठाउक रे बाळा
अजूनही तू भूका
माझ्या अंगाईसाठी
अर्ध्या पोटावरी जागा!

या फाटक्या संसारात
बाळ गातो - आई-आई
दूध न देऊ शकली
तुझी लाचार आई!
सांग माझ्या बाळा
गाऊ कशी अंगाई?
गाऊ कशी अंगाई?

स्वरचित : कु. प्रिती अशोक खेडेकर
दिनांक : २३.१२.२००३ वेळ : ७.५० वार - मंगळवार

विभाग - मुक्त विभाग
विषय : - दारिद्र्य, स्त्री अत्याचार, उपासमार, व्यसन, लाचारी, सत्य - जीवनाचे!

'आता काही नाही!'

कुणी घर देता का घर?
राहणे आता नाही
कुणी देता का चादर?
उब आता नाही

साऱ्यांना सर्वस्व दिल्यावर
उरते फक्त माती
घराचे अंगणही दिल्यावर
पायरीची उरते स्मृती
कुणी अंगण देता का अंगण?
दारात अंगण नाही.............

हाडामासाचे देह हे
वूद्धापकाली ओझे होते
आपल्यांच्याच दुष्ट पसारयात
परके नाते कळते
कुणी नाती देता का नाती?
आपली माणस नाहीत.............

शेजारी दिप लाविले
अंधार माझ्या घरी
लाडक्या लेकरांची आता
करावी चाकरी
कुणी प्रेम देता का प्रेम?
प्रेमाची ओळख नाही
कुणी जीवन घेता का जीवन?
आता जगण्याला अर्थ नाही...................

स्वरचित:- प्रिती अ. खेडेकर
२१.७.२००१ शनिवार
सायंकाळी : - ४.२५

( हि कविता मला त्यावेळी सुचली जेह्वा मी नटसम्राट या नाटकातील एकपात्री अभिनय केला होता! त्यावेळी माझ्या डोळ्यांत पाणी आला होता हे वाचून कि नटसम्राटांच्या मुलांनीच त्यांच्या आई-वडिलांवर चोरीचा आळ घातला होता! त्यावेळी मला हि कविता लिहावीशी वाटली........................)

'तेही आयुष्य असतं'

आयुष्य म्हणजे काय असतं?
आयुष्य मानून जगण आयुष्य
आणि न मानता जगत जाणं
तेही आयुष्य असतं !

भरजरी शालूच आयुष्य
इंद्रधनुच्या रंगांचं आयुष्य
कधी फाटक्या झोळीप्रमाणे
तर कधी मिणमिणत्या पणतीच.........

आयुष्य म्हणजे सुखाचा गोड झरा
आयुष्य म्हणजे वर्षेचा थेंब लाजरा
वादळ म्हणून बरसणार
तर कधी किनाऱ्यावर पोहचून झिजवणार.........

पंख होऊन उडणार आयुष्य
रानात मोर होऊन नाचणार आयुष्य
कधी छाटलेल्या पंखासारख
तर कधी पिंजऱ्यात तडफडणार..............

पुनवेच्या चंद्राचे आयुष्य
शीतल चांदण्याचे आयुष्य
कधी अमावस्येच्या चंद्रासारख
तर कधी ग्रहण होऊन येणार.................

मायेच्या सावलीच आयुष्य
पीताच्या संरक्षणाचे आयुष्य
कधी छत्र हरवल्याचे सांगणारे
तर कधी एकटे जगायला लावणारे.............

ओंजळ भरलेल्या नात्याचे आयुष्य
मेघ होऊन बरसणार आयुष्य
कधी रिकाम्या ओंजळीच्या खंतासारख
तर कधी हाती असूनही निसटल्यासारख................

आयुष्याची दोरी लांब
कधी आखूडहि येते
कधी नात्याच्या गर्दीत
माणसाला एकटे सोडते.........
एकटेपणात नात शोधणार आयुष्य
नात्यात एकटेपण जपणार आयुष्य .............
आयुष्याला नात शिकवणारही
शेवटी आयुष्यच असतं!

कु. प्रिती अशोक खेडेकर
१८.०९.२००९ शुक्रवार रात्री - १.४०

विषय : - आयुष्य!

स्वप्नात जागवलेस तू......

नात्यात बांधुनी मला
रडता हसवलेस तू.....
डोळ्यांत झोप येता
स्वप्नात जागवलेस तू......



काही शब्द तुझे होते
काही मी दिले
शब्दांच्या या खेलात
नवे अर्थ आले
काही अर्थात माझ्या
भाव आणलेस तू...



ओळख होती नवीच
जुने काही वाटायचे
तुझ्या नसन्या च्या ओलखितहि
मी मला भेटायचे
काही माझ्या ओलखिच्या
जाणीवेत आलास तू....



नसे जरी काही आपल्यात
आपलेच काही असायचे
नसताही भाव नात्यात
भाव मला शोधायचे
काही माझ्या भावाला
प्रेम दिलेस तू........



रात्र ती संपली नाही
डोळ्यांत मी जागली
तुझ्या ओढित जायचे
स्वप्नासाठी झोपली....
काही माझ्या स्वप्नासाठी
अजूनही जागवलेस तू.....

स्वरचित :- प्रिती अ. खेडेकर

'तू काही देतोस'

प्रेम करण्यासाठी हवे काही
असे जेह्वा सांगतोस
कुरूप या नात्याचे तेह्वा
अर्थाचे गणित मांडतोस!

फिरत होतास तू चांदण्यात
सावलीपासून हरवलास
माझ्या असण्याच्या क्षणातही
'नाही' म्हणून उरलास!

सांगितले शब्दांनी बरेच
तू मूका झालास
माझे अर्थ घेताना
परका 'भाव' बनलास!

त्या एका कातरवेळी
एकटेपण तू दिलेस
माझ्या जीवन बागेत
का तू 'काटे' भरलेस?

तू होतास लाटेवरी
किनारा मला केलेस
विसरून लाटेच्या नात्यात
माझे 'असणे' नेलेस!

स्वप्न तुझ्यातच होती
ना ती जाणलीस
स्वप्न म्हणून उरण्यातही
फक्त 'जाग' दिलीस!

अजूनही त्या वाटेवर
कधी पाउले देतोस
वारा बनून येताना
'ठसे' घेऊन जातोस!

तू येणारच नाही तरी
आठवणीत का येतोस?
माझ्या आठवणीत मग
'खंत' म्हणून उरतोस!

आता मी सावरले तरी
त्याच तिथे उभा असतोस
मी नाही त्या वाटेवर
आठवणींशी का भांडतोस?

येईल कधी ते प्रेम
जेथे तू माझा होतोस
माझ्यातले प्रेम जाणायला
माझ्यातला 'तू' देतोस!

स्वरचित : प्रिती अशोक खेडेकर
दिनांक : २९.०९.२००९
वेळ : रात्री १.४०

' माझा प्रवास'

प्रवास केला मी या वळणावर
आज तो विसावला जरासा
पडतो, उठतो, क्षणभर चालतो
नक्की हा प्रवास कसा?

कुणाच्या घरी कुण्या नावाने
जन्म इतुका झाला
लेक लाडकी होती
धर्म परका झाला
वार आसवांचा होताही
प्रवास चालू होता...............

सतीच्या रूपाने जन्म झाला
ज्वाळांचा हक्क मोठा
चार बाजूंच्या बंदिशाळेत
भरला रक्ताचा साठा!
वेदना रक्ताच्या होताही
प्रवास चालू होता...............

समाज नावाच्या सैतानाने
घेतला अब्रूवरी सूड आता
प्रपंचाच्या भाराखाली
बाजारी विकली ती माता!
अब्रूच्या चिंध्या होताही
प्रवास चालू होता...............

गंगेच्या पाण्यातील फरक काय?
पावित्र्य आणि पाप सारेच त्यात
मळविली पदराची किनार
पावित्र्य ना राखले हीच खंत!
जुगार नात्याचा होताही
प्रवास चालू होता...............

गळा आज गळ्यानेच कापला
मीठी त्या नाराधमाची
प्रेतावर जी चढतील फुले
शेवटी काय कोमेजायाची
शेजारी प्रेत जलताही
प्रवास चालू होता...............

शेवटी आले वळण शेवटचे
आधीही जगून मृत होते
चढतील फुले आणि मगरीचे अश्रू
देह स्त्री जातीचे होते!
राख होऊनही उरताना
प्रवास चालू होता...............
चालून थांबला होता
प्रवास 'स्त्री' जन्माचा!

स्वरचित : प्रिती अ. खेडेकर
१३.७.२००१ शुक्रवार
वेळ : संध्याकाळी ६.००

'भाकरी'

भाकरीची किमया न्यारी
कधी उरते कधी संपते
कधी पोटाच्या अर्थात
'भूक' म्हणून उरते!

बाळाच्या लाळेतली भाकरी
मायेचा घासही देते
कधी प्रेमभावनेत अडकून
भाकरी पूर्ण मिळते!

संतांच्या दानाची भाकरी
व्रताच्या मांगल्यात येते
कधी पुण्याच्या लोभापोटी
भाकरी अर्धीच उरते!

भाकरीसाठी होते चोरी
आपल्यांचा घात करते
कधी कुत्र्याच्या पुढ्यातली
भाकरी उष्ठी मिळते!

नोकरीसाठी असते भाकरी
कधी भीक म्हणून उरते
कधी गुलामीच्या नावाखाली
भाकरी तव्यावर जळते!

नेत्याच्या तोंडाची भाकरी
वेशेच्या आत्म्यात दिसते
कधी लाचारीच्या जगण्यात
भाकरी शिळी मिळते!

जन्माच्या बारश्याची भाकरी
मृत्यूचे श्राद्ध घालते
कधी जन्म - मृत्यूमध्ये
भाकरी जन्म घेते!

अशी भाकरी जेह्वा
पोटाला चिमटे काढते
माझ्या अर्ध्या पोटाची
कहाणी नेहमीच सांगते...................

स्वरचित : - कु. प्रिती अशोक खेडेकर
दिनांक :- २३.०९.२००९ वेळ :- रात्री १.00
विषय : उपासमार, लाचारी, बेकारी, भ्रष्टाचार, गुलामी, जीवनाचे सत्य!

'अपराध माझा'

अपराध माझा असा काय झाला?
जवळी येऊन मग दूर तू गेला

सांगून बसले हृदयाचे बोल
तू ना जाणले प्रीतीचे मोल
जवळी येता स्वप्न झाले
एकांताचे कारण आले
अपराध माझा असा काय झाला?
स्वप्नाच्या दारी थेंब आला!

तू येता ओठी आले
शब्द बनूनी गीत झाले
तरी न जाणले गुन्हा हा कसला?
प्रेम करण्याचा बहाणा झाला
अपराध माझा असा काय झाला?
आपलाच भाव परका झाला!

सुन्या माझ्या अंगणी
येऊन जा रे
या मनास जाणून घे रे
तू नसल्याची ओढ, हि खंत
ना तू येण्याचा माझा अंत
अपराध माझा असा काय झाला?
तुझ्यासाठी मरण्याचा बहाणा मिळाला...............

स्वरचित :- प्रिती अ. खेडेकर
वेळ : ७.००
दिनांक : २९.०९.२००२ वार : - रविवार

कधी काही वाटणारे...............

कधी वाटत आपलच घेऊन
आपणास शोधावे
मुक्या शब्दांना ओठ देऊन
शब्दांतही बोलावे...............

कधी वाटत माझ्या सावलीत
मी मलाच शोधावे
सावलीला घेऊन सोबत
नाते सावलीत घ्यावे..............

कधी वाटत घेऊन रंग
बेरांगातही रंगावे
घेऊन रंग जीवनाचे
रंगात अंग शोधावे.........................

कधी वाटत होऊनी रीत
मी प्रीत म्हणून आणावी
आणुनी नव्या प्रीतीला
रीतीने पारखावी.....................

कधी वाटत घेऊन मेळ
खेळ हा नियतीचा जाणावा
खेळूनी डाव एकदा
जन्म पुन्हा ओळखावा....................

कधी वाटत का वाटावे
मनात काही न वाटणारे
मनाच्या वाटेत मनाचे
कधी काही भेटणारे..................
- प्रिती खेडेकर
२३.११.२००९ सोमवार
वेळ : - सायंकाळी ७.५७

तुझी रात्र घेऊन जा.............

अडकली आहे जी तुझ्यात
ती रात्र तू सोडवून जा
प्रीतीच्या या अंधाराची
प्रकाश वाट ओळखून जा..............

जागले रात्री अशा
स्वप्नातही जागले...
तुझ्या गगनाच्या वाटेत
डोळ्यांशी चांदणे बांधले..............
त्या चांदण्या नात्यासाठी
चंद्र तू देऊन जा...............
अडकली आहे जी तुझ्यात
ती रात्र तू सोडवून जा

भेटीत अंधार माझ्या
चंद्रही डागाळला
तू नाही आलास मग
मार्गही मी तो सोडला..........
माझ्या त्या राहिलेल्या रात्रीत
तुझी रात्र घेऊन जा.............
अडकली आहे जी तुझ्यात
ती रात्र तू सोडवून जा

- प्रिती खेडेकर

का लाचार तू?

मी होते एकटे
का तू आलास?
नात्याला नाव देऊन माझ्या
'नाते' घेउनी गेलास


'प्रेम' काय माहीत नव्हते
शिकविलेस तू मला
त्याच प्रेमाची 'शपथ' म्हणतोस
विसरून जा मला


स्वप्न तू दिलीस
शब्द मी जोडले
आज त्या स्वप्नासाठीच
शब्दच परके झाले....


जाणते तू लाचार आहेस
म्हणून मी समजून घेते
तू दिलेल्या आसवाना
अजुनही 'प्रेमच' मानते


का तू म्हानालास
साथ देईन मी तुला
आयुष्यभर या नात्याच्या
मिठीत जपेन तुला?

तू म्हणतोस शोधू नकोस
मी तुला भेटणार नाही
तुला साथ देण्यासाठी
अस्तित्वच उरणार नाही....

नसेल जरी तुझे काही
आठवणी माझ्याच असतील
तू येण्याच्या वाटेवर
डोळे येउन थाम्बतिल....

तेव्हाही मी असेन तिथे
तुझे प्रेम घेण्यासाठी....
संपले जरी या नात्यात
उरेन तुझ्या मैत्रीसाठी ...
केवल तुझ्या मैत्रीसाठी .....

प्रिती खेडेकर

"तूच गणा"

एकला हा वास
निर्मितीचा श्वास
नव्याचा सहवास
तूच गणा................

आत्म्याचे गाव
प्रीतीचे नाव
मनीचा ठाव
तूच गणा...............

रम्याची सकाळ
दुष्टांचा दुष्काळ
सूत्रांची माळ
तूच गणा....................

लोचनातील भावना
मनातील कामना
याचनेसाठी याचना
तूच गणा.........................

गंधाची दरवळ
भक्तांची तळमळ
पर्णाची सळसळ
तूच गणा...............................

शेंदरी मूर्ते
विश्वची रमते
अधिष्ठानी जयते
तूच गणा.................................

स्वर्गाचे द्वार
जन्माचा उद्धार
सारेच बेजार
तुझ्याविना..................
माझाच आधार
तूच गणा.............................

स्वरचित : प्रिती खेडेकर
२८.११.२००३ शुक्रवार
वेळ :- सकाळी ११.१५

(बाप्पाला मी माझा भाऊ मानते! त्याला स्मरून हि कविता सुचली मला! आज १.१२.२००९ मंगळवार आणि खास करून दत्त जयंती आहे! मग माझ्या गणपती बाप्पाला वंदन न व्हाव असं कस होईल?)

' माझ्या आठवणी'

माझ्या विचारांत आज
पुन्हा एकदा आठवण आली
जुनीच होती ती पण
ओळख नव्याने झाली

नाती आपलीच होती
परकी झाली होती
आपुलकीच्या श्वासाने
मृतपणात जागी होती

आठवणीत मी माझ्या
सारे वाढवत गेले
वादळ आले असताही
नौका चालवत आले

सौख्याच्या आठवणीचे चित्र
पुसटसे झाले होते
आरसा तोच होता
मात्र तुकडे झाले होते

भ्रमाच्या भोवऱ्यात आज
आठवणीही अनोळख्या झाल्या
ओळख देऊन स्वार्थाला
माझ्यातून निघून गेल्या
अशा माझ्या आठवणी.....................
स्वरचित : प्रिती खेडेकर
दिनांक : ६.३.२००२ बुधवार
वेळ : रात्री ८.१०

तुझे नि माझे नाते काय ... (Priti )

तुझे नि माझे नाते काय ...
कलतानाही कळत नसे ...
तू जेथून चालुनी गेलास ...
तेथे अजुनही पाउलांचे ठसे ...

मी रात्र ना संपणारी ....
तू निवांत वारा मिठीतला ...
चांदण्या टिपून घेता ...
क्षण चांदने झाला ....

तू असा आलास की ....
निसटुनी गेलास का ...
नात्यात बांधुनी मला ....
नात्यात सोडुनी गेलास का ....

नाद तू नात्याताला ...
निनाद ..... ..... भासती शब्दातले ...
तू जे जानले माझ्यातले ...
मी माझे नाते जानले ....
प्रिती खेडेकर
दिनांक : २८.०४.२००९