Thursday, March 18, 2010

'संवाद शब्दांचा'

अडकले जे तुझ्यात येऊन
शब्द माझ्या ओठातले
शिकले जाणिवा देण्यास
भाव तुझ्या नात्यातले

संवाद दोन मनांचा
ओळख 'निखळ प्रीतीची'
शब्दांतही येऊन परतली
वाट येण्याच्या परतीची....

नव्या श्वासात जागले
अव्यक्त भाव मनाचे
तुझ्यातूनच भेटले माझे
नाते चार क्षणाचे

दिलेस श्वासात असे तू
थांबले क्षण कंठातूनी
शब्दांनाही जाग आली
मिटलेल्या ओठांतूनी....

दिलीस त्या राती तू
ओळख शब्दांत उरण्याची
आठवांतही ओळख आता
संवाद पुन्हा करण्याची

सांग आता शब्दांनाही
नसे सुटका तुझ्यातूनी
संवाद हा रोजचाच त्यांचा
व्यक्त होईल माझ्यातूनी
संवाद हा शब्दांतूनी..........

(स्वरचित) : कु. प्रिती अ. खेडेकर
दिनांक : १.०३.२०१० सोमवार
वेळ : रात्री २.३०

3 comments:

  1. प्रिती, कविता छान !पण काल्पनिक की स्वानुभव?
    स्वतःबद्दल मराठीत लिहिलं असतं तर माझ्यासारख्या मराठी वाचकास कळलं असतं !
    http://savadhan.wordpress.com

    ReplyDelete
  2. hehehe are Marathitunach lihayach hot! Pan vel nahi milala! mhanun Orkut varun copy -paste kela! hehehe

    Nakki taken swabaddal marathit! Thanks!

    ReplyDelete