Tuesday, December 8, 2009

"तूच गणा"

एकला हा वास
निर्मितीचा श्वास
नव्याचा सहवास
तूच गणा................

आत्म्याचे गाव
प्रीतीचे नाव
मनीचा ठाव
तूच गणा...............

रम्याची सकाळ
दुष्टांचा दुष्काळ
सूत्रांची माळ
तूच गणा....................

लोचनातील भावना
मनातील कामना
याचनेसाठी याचना
तूच गणा.........................

गंधाची दरवळ
भक्तांची तळमळ
पर्णाची सळसळ
तूच गणा...............................

शेंदरी मूर्ते
विश्वची रमते
अधिष्ठानी जयते
तूच गणा.................................

स्वर्गाचे द्वार
जन्माचा उद्धार
सारेच बेजार
तुझ्याविना..................
माझाच आधार
तूच गणा.............................

स्वरचित : प्रिती खेडेकर
२८.११.२००३ शुक्रवार
वेळ :- सकाळी ११.१५

(बाप्पाला मी माझा भाऊ मानते! त्याला स्मरून हि कविता सुचली मला! आज १.१२.२००९ मंगळवार आणि खास करून दत्त जयंती आहे! मग माझ्या गणपती बाप्पाला वंदन न व्हाव असं कस होईल?)

No comments:

Post a Comment