Monday, December 28, 2009

'रात शिशिराची'

एकटे होते रातीला
सोबती झाला वारा
स्पर्शात झेलून गारवा
छळतो मज शहारा

असेल ती अशीच रात
तुझी ग्रीष्माची मीठी
हरवून गुलाबी स्वप्नी
झेलीन अर्थ ओठी

अल्लड होऊनी भाव माझे
झेलीती शुक्राचे चांदणे
भाळून तुझ्या चंद्रावर
चांदण्या रातीचे जागणे

मनी हि हुरहूर कसली
भेटीलास कि घडेल काय?
घेशील ग्रीष्मात साजणा?
शिशिरही होईल निरुपाय!

बघ आलास तूही
ग्रीष्म होऊन गारव्याचे
शिशिराच्या आठवांत जपते
गीत अपुल्या मारव्याचे

नकोस जाऊस दूर अता
घे मीठीची गोधडी
तुझ्यातूनच सरेल मग
शिशिराची रात थोडी........................
रात शिशिराची थोडी....................

(स्वरचित) : प्रिती खेडेकर
२८.१२.२००९ सोमवार
वेळ : - रात्री १.४५

No comments:

Post a Comment