Sunday, December 27, 2009

'चेहरा आणि मुखवटा'

तू भेटलास असा
नवा चेहरा घेऊन
प्रीतीच्या जाणीवांना
भावात आणून

जाणलेस तू माझे
तुझी होऊन उरताना
अस्पष्ट चित्राचे
चेहऱ्यात रंग भरताना

तू दिलीस स्वप्ने
नसताही माझी झाली
अनोळखी चेहऱ्याची
स्वप्नांसाठी ओळख आली

अकस्मात आले वादळ
दुरावत चालल्या वाटा
ओळखीच्या चेहऱ्याचा का
माग घेई मुखवटा?

कसे साहू आरोप हे
बदनाम तुझा चेहरा?
कदाचित स्वार्थात मला
मुखवट्यानेच केला मोहरा!

इतकेच नको समजूस
चेहरे जे खरयाचे
नको चित्र रेखाटूस
नसलेल्या चेहऱ्याचे

जगते या आशेत
ओळखशील 'चेहरा' माझा
सत्याच्या आरश्यात
पाहशील चेहरा तू, तुझा

भेटेन पुन्हा चेहऱ्यात मी
होईन तुझाच आरसा
न ठेवणार अता
मुखवट्यावर भरवसा!

(स्वरचित) :- प्रिती खेडेकर
२६.१२.२००९ शनिवार
वेळ : - रात्री २.००

No comments:

Post a Comment