Tuesday, December 15, 2009

'खंत'

आपलीच माणसं जेह्वा
मुखवटे घालून फिरतात
नात्याची गणितं मांडून
'खंत' होऊन उरतात!

तू तशीच का आहेस?
प्रश्नचिन्हात धरतात
निर्माण झालेल्या भ्रमासाठी
मला 'उत्तर' करतात
माझेच 'संयम' मला
निरुत्तरात आणतात
वैचारिक भ्रमापुढे
हार मानतात

मोकळ्या माझ्या नात्याला
'प्रेम प्रकरण' म्हणतात
मैत्रीच्या जाणीवांना
किमंतीत गणतात
माझेच 'शब्द' नकळत
भावनेत अडतात
व्यक्त होत नाही म्हणून
स्वत:शीच भांडतात

खंत नाही याची कि
चुका त्यांच्यातून होतात
मला सावरण्याच्या ओघात
चुका माझ्यातच चुकतात
माझ्याच 'चुका' मला
नात्यात मारतात
'खंत' देऊन जाणीवांना
परके श्वास भरतात!

नसले जरी आपले नाते
खंताची नाती असतात
मनाच्या वास्तवाला
'खंत' होऊन पोसतात....................
केवळ खंत होऊन पोसतात...................

स्वरचित : प्रिती अ. खेडेकर
१५.१२.२००९ मंगळवार
रात्री : १.०५

No comments:

Post a Comment