Tuesday, December 8, 2009

'तेही आयुष्य असतं'

आयुष्य म्हणजे काय असतं?
आयुष्य मानून जगण आयुष्य
आणि न मानता जगत जाणं
तेही आयुष्य असतं !

भरजरी शालूच आयुष्य
इंद्रधनुच्या रंगांचं आयुष्य
कधी फाटक्या झोळीप्रमाणे
तर कधी मिणमिणत्या पणतीच.........

आयुष्य म्हणजे सुखाचा गोड झरा
आयुष्य म्हणजे वर्षेचा थेंब लाजरा
वादळ म्हणून बरसणार
तर कधी किनाऱ्यावर पोहचून झिजवणार.........

पंख होऊन उडणार आयुष्य
रानात मोर होऊन नाचणार आयुष्य
कधी छाटलेल्या पंखासारख
तर कधी पिंजऱ्यात तडफडणार..............

पुनवेच्या चंद्राचे आयुष्य
शीतल चांदण्याचे आयुष्य
कधी अमावस्येच्या चंद्रासारख
तर कधी ग्रहण होऊन येणार.................

मायेच्या सावलीच आयुष्य
पीताच्या संरक्षणाचे आयुष्य
कधी छत्र हरवल्याचे सांगणारे
तर कधी एकटे जगायला लावणारे.............

ओंजळ भरलेल्या नात्याचे आयुष्य
मेघ होऊन बरसणार आयुष्य
कधी रिकाम्या ओंजळीच्या खंतासारख
तर कधी हाती असूनही निसटल्यासारख................

आयुष्याची दोरी लांब
कधी आखूडहि येते
कधी नात्याच्या गर्दीत
माणसाला एकटे सोडते.........
एकटेपणात नात शोधणार आयुष्य
नात्यात एकटेपण जपणार आयुष्य .............
आयुष्याला नात शिकवणारही
शेवटी आयुष्यच असतं!

कु. प्रिती अशोक खेडेकर
१८.०९.२००९ शुक्रवार रात्री - १.४०

विषय : - आयुष्य!

No comments:

Post a Comment