Tuesday, December 8, 2009

'आता काही नाही!'

कुणी घर देता का घर?
राहणे आता नाही
कुणी देता का चादर?
उब आता नाही

साऱ्यांना सर्वस्व दिल्यावर
उरते फक्त माती
घराचे अंगणही दिल्यावर
पायरीची उरते स्मृती
कुणी अंगण देता का अंगण?
दारात अंगण नाही.............

हाडामासाचे देह हे
वूद्धापकाली ओझे होते
आपल्यांच्याच दुष्ट पसारयात
परके नाते कळते
कुणी नाती देता का नाती?
आपली माणस नाहीत.............

शेजारी दिप लाविले
अंधार माझ्या घरी
लाडक्या लेकरांची आता
करावी चाकरी
कुणी प्रेम देता का प्रेम?
प्रेमाची ओळख नाही
कुणी जीवन घेता का जीवन?
आता जगण्याला अर्थ नाही...................

स्वरचित:- प्रिती अ. खेडेकर
२१.७.२००१ शनिवार
सायंकाळी : - ४.२५

( हि कविता मला त्यावेळी सुचली जेह्वा मी नटसम्राट या नाटकातील एकपात्री अभिनय केला होता! त्यावेळी माझ्या डोळ्यांत पाणी आला होता हे वाचून कि नटसम्राटांच्या मुलांनीच त्यांच्या आई-वडिलांवर चोरीचा आळ घातला होता! त्यावेळी मला हि कविता लिहावीशी वाटली........................)

No comments:

Post a Comment