Tuesday, December 8, 2009

'तो नाही तसा का?'

(हि कविता त्या प्रिय मित्रासाठी ज्याच्या प्रामाणिक मैत्रीत मी माझे जीवन पुन्हा नव्याने जगू लागले...........)

तो आहे असा कि
तो नाही तसा का?
त्याच्या डोळ्यांत दिसतो
मनाचा आरसा का!

प्रेमळ आहे पण प्रेम मानत नाही
मैत्री करतो पण बंधन ठेवत नाही
तो आहे थोडा हळवा
तो नाही तसा का?

आठवणी जपतो पण आठवणीत जगत नाही
नात्याला मानतो पण त्यात अडकत नाही
तो आहे नाते निभावणारा
तो नाही तसा का?

वचनांची जाण ठेवतो पण उगा वचन देत नाही
शब्दांत मांडतो पण भावनेत येत नाही
तो आहे वचनांसाठी जगणारा
तो नाही तसा का?

गोगलगाय आहे थोडा पण मन तसे नाही
कृतीत घेतो सारे पण विचारात घेत नाही
तो आहे कृतीत मन आणणारा
तो नाही तसा का?

साऱ्यांना सार देतो पण आपल्या माणसांना विसरत नाही
मलाही आपलंच मानतो पण माझा म्हणून उरत नाही
तो आहे मैत्रीला श्वास देणारा
तो नाही तसा का?
जरी नसला तसा तो
मित्रच आहे माझा का!

- प्रिती खेडेकर
२०.९.२००९
रात्री : २.५०

No comments:

Post a Comment