Wednesday, December 30, 2009

'कहाणी उकिरड्याची'

रात्र ती चांदण्यांची
डागाळलेल्या चंद्रमाची
उकिरड्या शेजारची
कहाणी घडण्याची

हळुवार चाहूल झाली
हात अलगद आले
उकिरड्यावरी जन्म
कुणाचे बरे झाले?

पाठ क्षणात फिरली
डोळेही पाणावले
रात्रीच्या स्वप्नात मात्र
बाळ मातेस भुलले

भुंकण्याचा आवाज
बाळ जागे झाले
आई ना शेजारी
कासावीस झाले!

कुणाचे हात ते
तोंडाकडे सरकले
मद्याच्या घोटाने
बाळ दूधास मुकले!

स्वाद असे निराळा
बाळ हुंदका देत
उकीरड्याच्या पाळण्यात
नात्याला झोका देत

आई ना येणार
लाचार ती झाली
उकीरड्याच्या नात्याचा
धडा शिकवून गेली!

बाळाला कळले होते
हेचि माझे घर
त्याचाच बिछाना
नि त्याचीच चादर!

शांत मग पहुडला
धर्म नवा घेऊन
आता ही कहाणी
पुन्हा कोण जाणणार?

रात्र होती चांदण्याची
डागाळलेल्या चंद्र्माची
उकिरड्यात जन्मणाऱ्या
लाचार बाळाची!
त्या लाचार बाळाची.....................

(स्वरचित) :- कु. प्रिती अशोक खेडेकर
२३.१२.२००३ मंगळवार
वेळ : सांयकाळी : ७.१०

No comments:

Post a Comment